Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

कर्जत तालुक्यात 424 बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांनी विराजमान केले होते. या बाप्पांना बहुतांश ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करून निरोप देण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2026 | 02:47 PM
Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

Follow Us
Follow Us:
  • कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीला 424 गणपती बाप्पांचे विविध गणेश घाटांवर भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
  • नेरळच्या गणेश घाटावर 30 वर्षांची परंपरा असलेला विसर्जन सोहळा मध्यरात्रीपर्यंत रंगला, तर नेरळ पूर्वेच्या राजाचे सर्वात उशिरा विसर्जन झाले.
  • विसर्जनावेळी प्रशासन, पोलीस, ग्रामपंचायत आणि शिवशंभो युवा हायकर्सच्या कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांना मदत करत सुरक्षिततेची काळजी घेतली.
14 सप्टेंबर रोजी विराजमान झालेल्या बाप्पांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. कर्जत तालुक्यात 9590 बाप्पा विराजमान झाले होते आणि त्यापैकी 424 बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांनी विराजमान केले होते. या बाप्पांना बहुतांश ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करून निरोप देण्यात आला. तालुक्यात सर्वत्र शांततेत विसर्जन सोहळा पार पडला असून कर्जत नगरपरिषद, नेरळ ग्रामपंचायत आणि दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतमध्ये विसर्जन सोहळ्यासाठी भव्य शामियाने उभारण्यात आले होते.

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान झालेल्या बाप्पांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. तालुक्यात कर्जत,नेरळ आणि माथेरान पोलीस ठाणे हद्दीत विराजमान झालेल्या 424 बाप्पांना अनंत चतुर्दशी निमित्त पाण्यात विसर्जन करण्यात आले. कर्जत नगरपरिषद हद्दीत विविध सहा ठिकाणी बाप्पांच्या विसर्जनाची तयारी गणेश घाटांवर करण्यात आली होती. दहिवली, श्री प्रति पंढरपूर, मुद्रा, महावीर पेठ, शनि मंदिर याशिवाय गुंडगे आणि भिसेगाव येथे देखील नगरपरिषद कडून व्यवस्था करण्यात आली होती.

नेरळ कळंब रस्त्यावर उल्हास नदीवरील दहिवली पुलावर गणेश घाटांवर गणेश भक्तांसाठी दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत कडून व्यवस्था करण्यात आली होती. तेथे मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त आपल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी घेऊन येत होते. या बाप्पांवर माजी सभापती अमर मिसाळ, थेट सरपंच मिसाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पुष्प वृष्टी केली जात होती. तेथे वाहत्या पाण्यात ग्रामपंचायत तसेच स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते, नदीचे पाणी गढूळ असल्याने भक्तांना पाण्यात उतरू दिले जात नव्हते.

सर्वात मोठा आणि 30 वर्षाची परंपरा असलेला विसर्जन सोहळा नेरळ येथील गणेश घाटावर मध्यरात्री पर्यंत रंगला. नेरळ पूर्वेच्या राजाचे सर्वात उशिरा विसर्जन झाले. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे, प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या मार्गदर्शानाखाली बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा रंगला.

गणेश मूर्तींवर पुष्प वृष्टी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलिस अधिकारी राहुल वरोटे यांनी स्वतः कल्याण कर्जत रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी होणार नाही आणि गणेश भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत होते. तर येथील ब्रिटिश कालीन धरणावर कोणत्याही गणेश भक्तांना पाण्यात उतरण्याची मुभा नव्हती, ग्रामपंचायत कडून दोन बोटी तैनात ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून गणेश मूर्तींचे खोल पाण्यात विसर्जन केले जात होते.

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

शिवशंभो युवा हायकर्स यांची मदत…

अनंत चतुर्दशी चे दिवशी कर्जत मधील अनेक मंडळाचे गणपती बाप्पाचे विसर्जन उल्हास नदीमध्ये गणेश घाटावर झाले. या प्रसंगी शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे खालील पदाधिकारी व सदस्य प्रशासनाचे मदतीसाठी, गणेश विसर्जनसाठी रोप व इतर साहित्य घेऊन उपस्थित होते. विकास चित्ते, तुषार दिवेकर , शैलेश सातपुते, महेंद्र कर्वे, सुमित गुरव, गौरव चित्ते, नेहा सातपुते, इशांत मालुसरे आदी कार्यकर्ते गणेश भक्त आणि प्रकाशनाला मदत करीत होते.

Web Title: Karjat ganpati visarjan 424 idols immersed on anant chaturdashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
1

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
2

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
3

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
4

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.