कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील टाटा वीज केंद्र येथे नव्याने 1000 मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.या जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध कर्जत तालुक्यातील भिवपुरी, कराळे वाडी,तापकीर वाडी,हूमगाव, भिवपुरी, धनगरवाडा येथील रहिवाशांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.दरम्यान, उपोषणकर्त्यांनी सध्या सुरू असलेले काम आधी बंद करावे आणि नंतरच प्रशासनाने चर्चा करायला यावे अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा वीज केंद्राच्या बाजूला असलेल्या 200 एकर जमिनीवर नवीन वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. टाटा कोणी कडून तेथे 1000 मेगावॅट क्षमतेचा नवीन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या जलविद्युत प्रकल्पाला पहिल्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक शेतकरी तसेच स्थानिक जनतेने विरोध दर्शवला आहे. त्यासाठी स्थानिक जनता आणि शेतकरी यांनी आज सहा ऑक्टोबर पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. जलविद्युत 1000 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजूर केला आहे.
या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक जन सुनावणी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत विपरी कॅम्प आणि सादर केलेल्या अहवालातील सर्व योजनांचा तसेच मागण्यांचा टाटा पॉवर कंपनीने सदरहून योजना सीएसआर मध्ये समाविष्ट करण्यात येतील असे लिखित उत्तर दिले आहे.तसेच केंद्र सरकारच्या वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने सदर होऊन योजना विशिष्ट आणि मानस अटी शर्ती चालवून पर्यावरण मंजुरी दिली असून त्यामधील अटींची पूर्तता न केल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
या सर्व लिखित आश्वासने यांना टाटा कंपनी कडून हरताळ फसला गेला असून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेते. त्यामुळे स्थानिकांनी घटना आणि कायद्याच्या नियमांच्या अधीन राहून ग्रुप ग्रामपंचायत टाटा पॉवर कंपनी संपूर्ण सहकार्य करावे अशी निवेदने दिली होती.मात्र टाटा कंपनी मनमानी करून प्रकल्पग्रस्तांना नोकरी काम न देता बाहेरील राज्यातील कामगारांना प्राधान्य देत आहेत. परंतु ग्रामपंचायत हद्दीतील शाळा अंगणवाडी सोलर लाईट सोलर पॅनल रस्ते पाणी आरोग्य या मूलभूत सुविधांचे एकही कार्य त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या ॲक्शन प्लॅन प्रमाणे सुरू केले नाही किंवा अर्धवट करून सोडून दिले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये सरकारला याच योजना अभिप्रेत योजना आहेत.
केंद्र सरकार, माननीय जिल्हा दंडाधिकारी पंचायत समिती ग्रामसभा यांचे आदेश, अटी दावून कंपनीचे प्रोजेक्ट कार्य चालू आहे. त्यामुळे प्रशासनाचे राज्याचे व देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पर्यायी म्हणून उपोषण सुरू केले आहे. आजपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला त्या भागातील पाच गावातील रहिवाशी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांनी उपोष्ण सुरू केले आहे.या उपोषणाला हेमंत नवले,मंगेश गावंडे,संतोष घाडगे,हरिचंद्र मिसाळ,तानाजी तुरडे,प्रशांत दळवी, बजरंग घाडगे, संजय राऊंदल, जितेंद्र घाडगे, सरपंच संगीता माळी,उपसरपंच मिसाळ,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी दिसले आधी उपस्थित होते.