
neral protest
Karjat News : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नेरळ ग्रामपंचायत मधून नागरी समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. गोरख शेप यांच्या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थ,सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळत असून उपोषण गावातील समस्या घेऊन केले असल्याने मोठा पाठिंबा मिळत आहे.
नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी आपले नियोजित उपोषण सुरू केले.त्यावेळी शिवसेना शिंदे गट,शिवसेना ठाकरे गट,नेरळ व्यापारी संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यानंतर उपोषण स्थळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे,पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.शिवसेना शिंदे पक्षाचे प्रभाकर देशमुख,ठाकरे पक्षाचे बंडू क्षीरसागर,युवासेनेचे प्रथमेश मोरे,माजी सरपंच आयुब तांबोळी यांच्यासह मोहाची वाडी ग्रामस्थ तेथे गर्दी करून आहेत.
गोरख शेप यांनी नेरळ गावातील समस्यांबद्दल माहिती देताना नेरळ गावात पाणी नाही आणि अनेक ठिकाणी गावात पाणी पोहचत नाही.दुसरीकडे नागरीकरण होत असल्याने नेरळ,कोल्हारे, ममदापूर या तीन ग्रामपंचायत यांची नगरपरिषद करण्यात यावी.नेरळ गावात साधारण एक लाखाच्या आसपास वस्ती झाली आहे,पण अग्निशमन यंत्रणा नाही.तर फुटपाथ आणि रस्ता मोकळा करण्यासाठी व्यापारी संकुल बांधले पण ते व्यापारी संकुल खुले केले जात नसल्याने रस्ते मोकळे झालेले नाहीत.गावात मुबलक पाण्यातही जलजीवन योजना राबवली पण 2024 पासून कामे सुरू आहेत पण कामाची गती नाही तरी देखील 40 टक्के बिल अदा केले आहे.ते बिल कोणत्या कामाचे होते असा प्रश्न उपोषणात विचारला जाणार आहे.
KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण वाढले आहे त्यावर ग्रामपंचायत मधील प्रशासनाने निर्बंध नाही.तर बांधकाम खात्याच्या कल्याण कर्जत रस्त्यावर नेरळ विद्या मंदिर ते पेट्रोल पंप या भागातील रस्त्याच्या कडील अतिक्रमण दूर करण्यात यावे तसेच या रस्त्यावरील वन जमिनीचा प्रश्न सोडण्यात यावा आदी प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत.
नेरळ ग्रामपंचायत मधील घनकचरा प्रकल्प दोन कोटी खर्चून साकारला आहे,पण आज तेथे असलेल्या मशिनरी बंद पडल्या आहेत.साध्य प्रकल्पापासून 600 ते 700 मीटर अंतरावर कचरा टाकला जात आहे.बाहेरून कचरा आणून टाकला जात असून ग्रामपंचायत मधील कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही असा उपोषणकर्त्याचा आरोप आहे.
तर घनकचरा प्रकल्प साठी असलेली राखीव जागा साडे पाच एकर जमिनपैकी दोन एकर जागेवर अतिक्रमण केले आहे.ग्रामपंचायत कोणतीही कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे सर्व कामांचे शासकीय ऑडिट करावे आणि ते ग्रामस्थांचे उपस्थित व्हावे अशी मागणी केली.तर 15 वित्त आयोगात कामे झालेली नाहीत पण बिले काढले गेली आहेत.त्यामुळे नळजोडणी आणि घरपट्टी यातील माहितीत तफावत दिसत आहे.पाणीपट्टी वसुली मध्ये गैरव्यवहार झाला आहे याची चौकशी करण्याची मागणी केली.
Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट