Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीत टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी राज्य सरकारने ९९ एकर महसूल जमीन ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने वाद निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी सरकार गुजरातमधील खासगी कंपनीसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2026 | 11:51 AM
‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जत तालुक्यातील 99 एकर जमीन टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीच्या घशात
  • महाराष्ट्र शासनाचे दिली जमीन 30 वर्षाच्या भाडेकरावर
  • खासगी प्रकल्पासाठी शासनाच्या पायघड्या
कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायतमध्ये टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. या खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी वन विभागानंतर आता राज्य सरकार ने पायघड्या घातल्या आहेत.राज्य सरकारने आपली महसूल मधील 99 एकर जमीन 30 वर्षाच्या भाडेतत्वावर टोरंट कंपनीला विकली आहे. खासगी कंपनीला अशी सरकारी जमीन घशात घालण्याचा प्रयत्न पाहता राज्य सरकार गुजरात राज्यातील टोरंट कंपनीसाठी काम करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी केला आहे.तर तालुक्यातील टोरंट,पोशीर आणि शिलार या प्रकल्पाबाबत जागतिक पर्यावरण दिनी पाच जून रोजी कर्जत तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने मोर्चा काढण्याचा इशारा आणि निर्णय जाहीर केला आहे.

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

टोरंट एनर्जी पॉवर स्टोरेज सोल्युशन लिमिटेड या गुजरात राज्यातील खासगी कंपनीला प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील महसूल जमीन देण्यात आल्याची माहिती स्थानिक जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांना मिळाली. त्यामुळे याबाबत माहिती देण्यासाठी आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलन बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. बाबू घारे यांनी बोलताना टोरंट एनर्जी पॉवर स्टोरेज सोल्युशन लिमिटेड यांच्याकडून कर्जत तालुक्यात हैदोस घातला आहे. शासनाची जनतेच्या हक्काची जमीन सहा मे 2026 कर्जत तहसीलदार यांनी 30 वर्षाच्या भाडेकरार करून टोरंट कंपनीला दिली आहे. त्या जमिनीच्या 30 वर्षाच्या करारासाठी फक्त दोन कोटी 80 लाख रुपये कंपनी कडून शासनाला देण्यात आले आहेत. सदर जमीन सावळे गाव ते कोटींबे गाव या मधील असून साधारण 99 एकर जमीन खासगी प्रकल्पासाठी देण्यास बाबू घारे यांनी विरोध केला आहे.सरकारी प्रकल्प तेथे राबविला असता तर स्थानिक जनतेला फायदा झाला असता आणि तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला असता असा दावा घारे यांनी केला.

पुलाचीवाडी सजेमधील ही जमीन

37 हेक्टर जमीन म्हणजे 99 एकर जमीन भाडेकरार करून देण्यात आली आहे. याद्वारे शासनाने कर्जत तालुक्यातील जनतेची फसवणूक केली असून जनतेला आणि भूमिहीन शेतकरी यांना शासन आपली जमीन देत नाही.

ढाक येथील गावठाण जमीन वर डोळा

ढाक गावठाण लाटण्याचा प्रयत्न सुरू टोरंट कंपनी कडून सुरू असून सदर जमीन ग्रामपंचायत चे विस्तारित गावठाण आहे.त्याबाबत आपण तत्काळ पावले उचलली असून येथील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असून अशी जमीन हस्तांतरण करू नये असे स्पष्ट कळवले आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांना लेखी अर्ज दिला असून ढाक येथील वदप ग्रामपंचायत मधील जमीन कोणत्याही खासगी कंपनीला देऊ नये अशी मागणी केली आहे.

मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

आम्ही पत्रव्यवहार करीत असून आम्ही सहा आठ महिन्यापासून विरोध करीत असून शासन गुजरात राज्याचे एका खासगी कंपनीला जमीन देण्याचा घाट घातला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातला असून आम्ही भेट घेणार आहोत.त्यात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून कामकाज केले असल्याने त्यांना संपूर्ण विषय माहिती असून त्यांचा अनुभव आमच्या फायद्याचा असणार आहे. खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे टोरंट प्रकल्प रोखण्यासाठी आवाज उठवण्याची विनंती केली आहे.
शासनाच्या प्रकल्पासाठी ही जमीन न देता खासगी प्रकल्पासाठी जमीन दिली असेल तर आमचा त्यास विरोध आहे.आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आवाज उठवत आहोत.

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

राजकारणी गप्प का?

तालुक्यातील राजकारणी गप्प का हे जनतेला माहिती आहे.पाली ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ त्रस्त आहे हे काल येथील उपसरपंच निवडीचे वेळ दिसून आले आहे.

महसूल मंत्र्यांनी उत्तर द्यावे

राज्याचे महसूल मंत्री हे स्वतःला मिस्टर क्लीन समजतात.त्यांच्या आदेशाशिवाय जमीन कोणत्याही शासकीय किंवा खासगी प्रकल्पाला देता येत नाही. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी आदेश दिला असेल तरच 100 एकर जमीन मोठा सरकारी प्रकल्प उभा राहिला असता तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते.

पर्यावरण दिनी निदर्शने आणि मोर्चा

जागतिक पर्यावरण दिनी टोरंट सह पोशीर आणि शिलार धरणाच्या विरोधात आम्ही येथील पर्यावरण वाचवण्यासाठी मोर्चा काढणार आहोत.शिवसेना ठाकरे पक्षाने या सर्व प्रकल्पांना विरोध केला असून या प्रकल्पांना कर्जत तालुक्यातून हाकल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही.शेती पुरक व्यवसाय बुडणार असून विजेच्या वाहिन्या आणि पाईप लाइन टाकून आमच्या जमिनी मध्ये टाकून दिल्या जाऊ नयेत यासाठी आम्ही संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहोत.

तहसीलदार यांच्याकडून उत्तर

शासनाचे वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सदर जमीन टोरंट कंपनीला देण्याचा निर्णय झाला आहे.मी केवळ प्राधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले असून अशी जमीन मागणीनुसार दिले जात असते.

Web Title: Karjat torrent hydropower project land lease protest shiv sena ubt news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक
1

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
2

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा
3

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद
4

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.