Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी आदिवासींच्या संमतीविना दळी जमिनीतून रस्ते तयार करून अवजड मशिनरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडतोड आणि ग्रामपंचायत तसेच जमीनमालकांची परवानगी न घेतल्याचा दावा करत दळी भूखंडधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 02:36 PM
टोरंट कंपनीचा प्रताप! टोरंटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

टोरंट कंपनीचा प्रताप! टोरंटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • अवजड मशिनरी नेण्यासाठी दळी जमिनीतून रस्ता बनवला
  • झाडे तोडून बनवला रस्ता
  • दळी भूखंड धारक यांचा आक्षेप
कर्जत : कर्जत तालुक्यातील जमिनीवर होऊ घातलेल्या टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जलविद्युत प्रकल्प व्हावा यासाठी सरकार स्तरावरून सर्व मदत केली जात आहे. त्यामुळे आदिवासी लोकांच्या संमतीविना आदिवासी लोकांच्या मालकीच्या दळी जमिनीतून अवजड मशिनरी नेण्यासाठी रस्ते बनवले आहेत. दरम्यान झाडे तोडून आणि मालकीच्या दळी जमिनीतून रस्ते बनवले गेल्याने टोरंट कंपनी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत असून दळी भूखंड धारक आक्रमक झाले आहेत.

टोरंट वीज कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यात सर्व कायदे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून येत आहेत.ज्या भागात धरण बांधले जाणार आहे त्या भागातील जमिनीचे माती परीक्षण आणि दगड परीक्षण करण्यासाठी दोन मशीन कंपनी कडून जंगलात नेण्यात आल्या आहेत. त्यात ज्या भागात मातीचे परीक्षण केले जात आहे त्या जमिनी स्थानिक आदिवासी लोकांच्या मालकीच्या आहेत. दळी जमिनीमध्ये माती परीक्षण करण्यासाठी आणि दळी जमिनीमधील झाडे तोडून रस्ते बनवण्यासाठी ना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली ना स्थानिक जमीन मालक असलेल्या शेतकऱ्यांची परवानगी घेतली गेलेली नाही. माती परीक्षण करण्यासाठी लागणारी अवजड मशिनरी पाली गावातून आंब्याची वाडी येथे नेण्यात आली. तेथून आदिवासी लोकांच्या जमिनीमधून रस्त्याची खराबी करीत हे मशिनरी नेण्यात आल्या.

Purandar Airport : हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

या मशीन जंगलात जाण्यासाठी पायवाट शिवाय कोणताही रस्ता नसल्याने रस्ते बनवणे आवश्यक होते. त्यावेळी आदिवासी लोकांचे दळी जमिनीमध्ये मशिनरी नेण्यात येत असताना एखादे झाड आले तर ते झाड तोडून टाकले जात होते.माती आणि दगड परीक्षण करण्यासाठी दोन मशीन जंगलात नेण्यात आल्या आहेत. मोहमाळ वाडी मधील आदिवासी लोकांचे दळी भूखंड ज्या भागात आहेत त्या जमिनीमध्ये एकही शेतकऱ्याने मशीन चालवण्यासाठी तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.त्याचवेळी मशीन नेण्यासाठी रस्ता देखील दिलेला नाही आणि असे असे असताना मशीन नेण्यात आल्याने स्थानिक सरपंच संजना बाळू पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमच्या ग्रामस्थांच्या दळी जमिनीमध्ये रस्ते बनवले जातात,तेथील झाडे तोडली जातात याचे कोणत्याही शेतकऱ्याला विचारले जात नाही. त्याचवेळी पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत कडे देखील साधे पत्र देऊन विचारणा केली गेलेली नाही असा आरोप सरपंच पवार यांनी केला आहे.मशीन नेण्यासाठी मोहमाळ वाडी पासून जंगलात एक किलोमीटर अंतर पर्यंत रस्ता बनवला असून आदिवासी शेतकरी यांच्या दळी भूखंडाचे नुकसान केले आहे.त्याचवेळी वाटेत येणारी झाडे समूळ नष्ट करण्यात आली आहेत हे एकप्रकारी मग्रुरी असून वन विभाग देखील मूग गिळून गप्प असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

तर दुसरी मशीन ही त्यापुढे दोन किलोमीटर आत मध्ये जंगलात नेऊन पुढे डोंगरात चढवली आहे.डोंगराची मालकी वन विभागाची असून त्या जमिनीत खडक फोडून मशिनरी बसवण्यात आली आहे.त्या मशिनरी द्वारे तेथील दगड परीक्षण टोरंट कडून सुरू आहे.जी सर्व कोणत्याही शेतकऱ्यांची तसेच दळी भूखंड धारक आणि वन विभागाची परवानगी न घेता केले असल्याने टोरंट कंपनीच्या पाठीशी सरकार असल्याचे आरोप स्थानिक आदिवासी करीत आहेत. पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत मधील पाली कातकरी वाडी, आंब्याची वाडी आणि मोहमाळ वाडी मधील ग्रामस्थ यांनी आवाज उठवला असून आंदोलन करून आपल्या जमिनी परत मिळवू असा इशारा सरकारला दिला आहे.

आमच्या मालकीच्या दळी जमिनी मध्ये मशिनरी नेण्यात आल्या आहेत,त्यासाठी रस्ते बनवले जात असून आमच्या जमिनीतून रस्ते करताना आमच्या दळी भूखंड धारक यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती सरपंच संजना पवार यांनी दिली.

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

Web Title: Karjat torrent hydropower project tribal dali land road construction controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा
1

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये एल्गार; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक
2

पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये एल्गार; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?
3

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण
4

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.