Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी

कर्जत तालुक्यातील वाढत्या फार्म हाऊस पर्यटनाला चालना देण्यासाठी ओला-उबर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांना कर्जतमध्ये सोडण्याची सुविधा असली तरी परतीच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने गैरसोय होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 02:34 PM
Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी

Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांच्या सोयीसाठी कर्जत तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची मागणी.
  • सध्या ओला-उबरकडून पर्यटकांना कर्जतमध्ये ‘ओन्ली ड्रॉप’ सेवा मिळत असल्याने परतीच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो.’
  • स्थानिक वाहनचालकांनी ओला-उबरमध्ये सहभागी झाल्यास पर्यटकांना सुविधा आणि चालकांना व्यवसाय मिळेल.
कर्जत: कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून पुढे आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतघरे उभी केली असून तालुक्यातील शेतकऱ्यांची किमान दोन हजारहून अधिक शेतघरे असून त्या ठिकाणी फार्म हाऊस पर्यटनासाठी खुली केली आहेत. या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळत असून मागील काही वर्षांपासून स्थानिक प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यांनी मुंबई पुणे सारख्या शहरातून येणाऱ्या ओला उबेर या वाहनांना पर्यटकांना सेवा देण्यास विरोध केला आहे. दरम्यान कर्जत तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी ओला उबेर यांना सेवा देण्याची मागणी कर्जत भूमिपुत्र फार्म हाऊस संघटना यांनी केली आहे.

14 बोगदे, 93 पूल अन्…; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु

पर्यटकाला वाहने उपलब्ध होणे गरजेचे

सध्या स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेवा ग्राहकांना मिळत असून ग्राहक देखील अशा ऑनलाईन सेवेवर खुश आहे. ऑनलाईन सेवा देणाऱ्या साधनांना स्पर्धेच्या आणि डिजिटल युगात मोठे आर्थिक पाठबळ मिळताना दिसत आहे. कर्जत तालुका देशाच्या पर्यटनाच्या नकाशात पर्यटन म्हणून पुढे आला आहे. कर्जत तालुक्यात स्थानिक शेतक-यांनी फार्म हाऊस उभी करून पर्यटन व्यवसाय सुरु केले आहेत. त्या व्यवसायात स्थानिक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. अशावेळी आता पर्यटक हा रात्री अपरात्री कधीही येत असतो आणि त्यावेळी त्या पर्यटकाला वाहने उपलब्ध होणे गरजेचे असते. (फोटो सौजन्य – AI Created) 

ओला उबर चालक पर्यटकांना ओन्ली ड्रॉप

काही प्रसंग घडल्यास हा पर्यटक रात्री देखील आपल्या घरी परत जात असतो आणि त्यावेळी त्या पर्यटकाला वाहन उपलबध होत नाही. स्थानिक वाहनचालक हे रात्रीच्या वेळी सेवा उपलब्ध करून देत नसल्याने ओला उबेरवर अवलंबून राहावे लागते. पण कर्जत तालुक्यात ओला उबेर यांना पर्यटकांना आणून सोडण्याची मुभा आहे. परत नेण्याची मुभा नाही आणि त्यामुळे ओला उबेरकडून कर्जत तालुक्यात पर्यटकांना ओन्ली ड्रॉप या प्रकारात पर्यटकांना कर्जत तालुक्यात सोडण्याचे भाडे मिळतात. पुन्हा नेण्यासाठी ओला उबेरकडून कर्जत तालुक्यासाठी भाडे मिळत नसल्याने त्यांची वाहने येत नाही. त्यामुळे कोणत्याही वेळी पर्यटकांना कर्जत तालुक्यातून निघता येत नाही.

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

उबर वाहनांसाठी कर्जत तालुका खुला करावा

परिणामी पर्यटक हे अडकून पडतात आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत असल्याचे फार्म हाऊस रिसॉर्ट चालक यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कर्जत तालुक्यातील पर्यटन वाढावे यासाठी भूमिपुत्र संघटना यांच्याकडून अध्यक्ष उदय पाटील यांनी ओला उबेर वाहनांसाठी कर्जत तालुका खुला करावा अशी मोहीम हाती घेतली आहे. कर्जत तालुक्यातील पर्यटन आपल्या तालुक्यातील प्रवासी वाहतूक करणारे कार चालक यांनी ओला उबेर सुरु करावी अशी सूचना केली आहे. आपल्या तालुक्यातील वाहनचालक यांनी आता ओला उबेर सुरु करून आपल्या तालुक्यात बाहेरचे वाहनचालक यांची वाहने येणार नाहीत यांची काळजी घेतल्यास पर्यटकांना सेवा मिळेल आणि आपल्या तालुक्यातील कार चालक यांना चांगला व्यवसाय मिळेल असे मत भूमिपुत्र संघटनेचे आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Karjat tourism seeks ola uber access to boost tourist convenience raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
1

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
2

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.