Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण

महाड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट असतानाच पानसरे मोहल्ला परिसरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 10:59 AM
पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या; शहराच्या बहुतेक भागात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या; शहराच्या बहुतेक भागात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

Follow Us
Follow Us:
  • पानसरे मोहल्ला परिसरात नळाद्वारे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
  • वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
  • जलवाहिनीतील गळतीमुळे पाणी दूषित होत असल्याचा प्राथमिक अंदाज असून संपूर्ण यंत्रणेची तपासणी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
महाड: महाड शहरावर सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले असून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र शहराच्या पश्चिमेकडील पानसरे मोहल्ला परिसरातील नागरिकांना अल्पवेळेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यासोबतच दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला तीव दुर्गंधी येत असून पाणी दूषित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोहण्याचा मोहच बेतला जीवावर; साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, ‘ते’ स्वप्न राहिले अधुरेच…

या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महाड नगरपरिषदेकडे तक्रारी दाखल केल्या असून दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठीही प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अधिक प्रभावी नियोजनाचे अभियंत्यांनी दिले आश्वासन

या प्रकरणी महाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित भोईर याव्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. सध्या संबंधित भागातील नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जात असून त्याचे अधिक प्रभावी नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवकांकडूनही अपेक्षित दखल नाही

एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही अत्यंत कमी वेळेसाठी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पूर्वी अर्धा ते एक तास सुरू राहणारा पाणीपुरवठा आता अत्यल्य वेळेसाठी होत असल्याने पाणी साठविणेही कठीण बनले आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांना गेल्या एक ते दोन वर्षांपासून पाणीपुरवठ्याबाबतच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे प्रशासकीय राजवट संपल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांकडूनही या समस्येची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?

दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण जलवाहिनीच्या मध्यंतरातील गळती असू शकते, काही ठिकाणी नाला किंवा अन्य भागाजवळ जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी मिसळत असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण जलवाहिनीची तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण होताच नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. – रोहित भोईर, अभियंता, पाणीपुरवठा विभाग

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mahad faces water crisis residents complain of contaminated and foul smelling water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
1

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
2

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर
3

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

आंदोलन संपताच दिल्ली मेट्रोची मोठी घोषणा; 3 स्थानके पुन्हा सुरू, 15 अद्याप बंद
4

आंदोलन संपताच दिल्ली मेट्रोची मोठी घोषणा; 3 स्थानके पुन्हा सुरू, 15 अद्याप बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.