Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 02:44 PM
Raigad Rain Havoc

Raigad Rain Havoc

Follow Us
Follow Us:
  • महाडमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा दिला.
  • पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बालगोपाळांसह नागरिकांनीही आनंद व्यक्त केला.
  • या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
महाड: अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाने रविवारी महाडवर कृपादृष्टी केली आणि कोसळलेल्या पावसाच्या सरींनी उष्णतेने होरपळलेल्या जनजीवनाला मोठा दिलासा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. तर पावसाच्या प्रतीक्षेत आस लावून बसलेल्या बळीराजाच्या मनातही नव्या आशेचे अंकुर फुटले. रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक दाटून आलेल्या काळ्याभोर ढगांनी संपूर्ण परिसर व्यापला आणि काही क्षणांतच मुसळधार सरींनी महाडला अक्षरशः चिंब भिजवून टाकले. अनेक दिवसांपासून तापलेल्या धरतीला जणू या पावसाने शीतल स्पर्श दिला.

Kalyan News: घरात नेहमीसारखं सगळं सुरू होतं… पण कोपऱ्यात दिसलं असं काही की कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली!

रस्त्यांवर धावपळ उडाली, काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. मात्र प्रत्येकाच्या मनात या पावसाबद्दल समाधान आणि आनंदाचीच भावना होती. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. दिवसभर ऊन आणि ढंग यांचा सुरू असलेला लपंडाव, दमट वातावरण आणि वाढलेली उष्णता यामुळे जनजीवन अस्वस्थ झाले होते. अशा परिस्थितीत रविवारी बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण करत सर्वांनाच सुखद दिलासा दिला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

बालगोपाळांचाही आनंदाने सुरू जल्लोष

पावसाचे पहिले थेंब पडताच बालगोपाळांनीही आनंदाने जल्लोष केला. अनेक ठिकाणी मुले पावसात भिजत, खेळत आणि सरींचा मनमुराद आनंद लुटताना दिसून आली. अनेकांसाठी हा पाऊस केवळ ऋतूचा बदल नव्हता, तर तो उन्हाच्या काहिलीवर मिळालेला निसर्गाचा दिलासादायक स्पर्श ठरला. शेतकरी वर्गासाठी हा पाऊस विशेष समाधानकारक ठरला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने पेरण्यांबाबत संभ्रमाचे वातावरण होते. कृषी विभागाने पेरण्या पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असला, तरी मृग नक्षत्रावर विश्वास ठेवत काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरणी केली होती. त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती.

‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’!; वरळीत रंगला ‘दिव्याज फाउंडेशन’चा भव्य योगोत्सव

शेतीकामांना गती मिळणार

  • रविवारी झालेल्या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळाल्याने शेतीच्या कामांना गती मिळणार असून बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
  • शनिवारी काही प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र रविवारी सायंकाळी बरसलेल्या दमदार सरींनी संपूर्ण वातावरणच बदलून टाकले. गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाही पाऊस दडी मारून बसला होता.
  • अखेर रविवारी वरुणराजाने दिलेली ही हजेरी महाडकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरली.
  • आकाशातून कोसळणाऱ्या सरीनी तापलेली धरती शांत केली, मनाला गारवा दिला आणि नव्या आशेची चाहूल लावली.
  • आता आगामी काळातही समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतशिवारांसह जनजीवनही हिरवाईने नटावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mahad rain update heavy showers bring relief from heat raise hopes for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
3

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
4

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.