Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Satara News : पावसाअभावी शेतीचे अर्थकारण अडचणीत आले असताना वाढत्या चारा, पशुखाद्य आणि पशुपालन खर्चामुळे दुग्ध व्यवसायही संकटात सापडला आहे. दूध उत्पादकांना वाढीव खरेदी दर देण्यासह दुष्काळी मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळामुळे शेतीसोबत पशुपालनही संकटात
  • दूध उत्पादनाचा खर्च वाढला, उत्पन्न मात्र मर्यादित
  • दुष्काळी मदत कागदावर नको, बांधावर पोहोचवा
Satara News:पावसाअभावी शेतीचे अर्थकारण कोलमडले असतानाच शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही आर्थिक संकटात सापडला आहे. चारा, पशुखाद्य, औषधे, मजुरी आणि जनावरांच्या संगोपनाचा खर्च सातत्याने वाढत असताना दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न मात्र त्या तुलनेत वाढलेले नाही.

त्यामुळे दुष्काळाने आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता पशुपालनाचा खर्च भागविण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना तातडीने दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरात वाढ करावी आणि दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या सवलती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)ने केली आहे.

दुष्काळामुळे शेतीसोबत पशुपालनही संकटात

सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी पशुपालनाकडे उत्पन्नाचा आधार म्हणून पाहत आहेत. मात्र जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसणे, पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि औषधोपचाराचा खर्च यामुळे दुग्ध व्यवसायाचे गणितही बिघडले आहे. त्यामुळे शेतीला आधार देणारा हा जोडधंदाच आता शेतकऱ्यांसाठी आर्थिक ओझे ठरत असल्याचे चित्र आहे.

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

दूध उत्पादनाचा खर्च वाढला, उत्पन्न मात्र मर्यादित

पशुखाद्याच्या वाढत्या किमती, चाऱ्याची कमतरता, औषधोपचार आणि मजुरीमुळे एका लिटर दूध उत्पादनामागील खर्च वाढत आहे. मात्र त्याच्या तुलनेत दूध खरेदी दर पुरेसा नसल्याने दूध उत्पादकांच्या हातात प्रत्यक्षात किती उत्पन्न उरते, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या खरेदी दरात तातडीने वाढ करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

उजनीवरील खाजगी मासेमारी ठेका रद्द; मच्छीमारांना मोठा दिलासा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

दुष्काळी मदत कागदावर नको, बांधावर पोहोचवा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सवलती आणि मदत केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणे आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

चारा, पाणी, आर्थिक मदत आणि अन्य दुष्काळी सवलती पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दुष्काळाची तीव्रता वाढण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास शेतीसोबत पशुपालनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

 

 

Web Title: Satara news farmers in the grip of drought milk industry also left the support fodder and animal feed have become expensive along with price hike there is a national call for urgent help cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • drought news
  • Farmer Crisis
  • Maharashtra Drought 2026
  • Marathi News

संबंधित बातम्या

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
1

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
2

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
3

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प
4

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.