गावांचे वैभव आणि गावपण कायम टिकवून ठेवा ; आदिती तटकरे यांचे गावकऱ्यांना आवाहन
खासदार सुनिल तटकरे,राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील गावांच्या विकास कामांसाठी निधी दिला आहे. एकाच दिवशी तालुक्यातील पाष्टी, घोणसे,रातविणे,बाभट,पानवे,सालविंडे,वरवठ्णे गावांतील 2.5 कोटी रुपये खर्चाचे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होळी उत्सवाचे शुभ मुहूर्तावर करण्यात आले.या वेळी आयोजित स्वागत कार्यक्रमात लोकपयोगी विकास कामांमुळे गावांमध्ये झालेला परिवर्तन आणि लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहता मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांनी आपल्या गावांचे वैभव आणि गावपण कायम स्वरुपी टिकवून ठेवा असे आवाहन केले.
सेवा आणि कर्तव्य पार पाडत असताना जनतेने आम्हाला दिलेला प्रेम आणि प्रेमरूपी भेटवस्तू कधीच विसरता येणार नाही.भेट वस्तू देण्यात येतात त्यात प्रामुख्याने प्रेम भावना असतात त्याची सविस्तर माहिती देताना खासदार सुनिल तटकरे यांच्या राजकिय व सामाजिक कार्य सेवेला आता ४० वर्षे पुर्ण होत आहेत.तेव्हा पासुन जनतेने प्रेमरूपी दिलेल्या भेटवस्तू कायम आठवणीत राहतील अशा संग्रही ठेवल्या असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी निदर्शनास आणून दिले.
होळी उत्सवाच्या सुभेच्छा देताना गावाची एकता आणि अखंडता कायम ठेवा असा मौलिक सल्ला दिला.पाष्टी कुणबीवाडी येथील ग्रामस्थांनी गाव अंतर्गत रस्ता बांधकाम उद्घाटन समारंभात मंत्री आदिती तटकरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा फोटोफ्रेम भेट दिला.या वेळी त्यांच्या समावेत नायब तहसिलदार चंद्रशेखर खोत,सपोनी संदीप कहाले,तालुका अध्यक्ष समीर बनकर,मुंबई निवासी अध्यक्ष महेश शिर्के,जीप माजी सभापती बबन मनवे,नगर पंचायत सभापती सुनिल शेडगे,महीला अध्यक्षा मिना टिंगरे,सुनिल महाडिक,सोनल घोले,सरपंच वनिता खोत,मंगेश मुंडे, गण अध्यक्ष नाना सावंत,महेश घोले,किरण पालांडे आदी मान्यवर गाव प्रमुख सरपंच,उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
विकास कामांचे लोकार्पण सोहळ्यात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पाष्टी गाव अंतर्गत रस्ता बांधकाम उद्घाटन,घोणसे काणसेवाडी रस्ता उदघाटन व सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन,मौजे रातविणे,बाभट,पाणवे येथे पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन,बाभट येथे संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन,साळविंडे बागाचीवाडी येथे रस्ताचे व महिला कार्यशाळेचे उदघाटन,वरवठणे कोंड रस्त्याचे भूमिपूजन समारंभ पार पडला आहे.