
Raigad News: कर्जत-खालापूरात राजकीय उलथापालथ! परिवर्तन आघाडीने मारली बाजी, अजित पवार–ठाकरे गट एकत्र
जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
कर्जत आणि खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समित्या यांच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. कर्जत तालुक्यात सहा तर खालापूर तालुक्यात चार जिल्हा परिषद गट अशा दहा जिल्हा परिषद गटांमधील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे कर्जत परिवर्तन आघाडी म्हणून लढणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर कर्जत परिवर्तन आघाडी कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. (फोटो सौजन्य – AI Created)
ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत आणि खालापूर या दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची कर्जत परिवर्तन आघाडी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्यातील सहा पैकी दोन जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या कर्जत परिवर्तन आघाडीचे पक्षाचे उमेदवार जाहीर केले.
भाजपा कर्जत परिवर्तन आघाडीमध्ये सहभागी होणार काय? असा थेट प्रश्न केला असता पुंडलिक पाटील यांनी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. आघाडी मधील शेकाप, काँग्रेस आणि शरद पवार गट यांना स्थान असणार काय? यावर उत्तर देताना नितीन सावंत यांनी हे सर्व आघाडीचे घटक पक्ष असून उर्वरित जागा घोषित करताना योग्य सन्मान राखला जाईल असे उत्तर दिले. अजित पवार गट, ठाकरे गट आणि अन्य पक्षांना कोणत्या जागा आहेत? या प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना नितीन सावंत यांनी सांगितले की, दोन्ही पक्षाचे दोन-दोन उमेदवार जाहीर केले पत्रकार परिषदेत उमेदवार जाहीर करू.