संग्रहित फोटो
सध्या या भागात इच्छुकांनी विविध सामाजिक कार्यक्रम, लग्नकार्ये, धार्मिक उत्सव आणि ग्रामपंचायत स्तरावरील छोट्या-मोठ्या बैठकांना उपस्थित राहून आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. “कोण बाजी मारणार?” या चर्चेने आता गावागावातील चावडीवर जोर धरला आहे. जुन्नरच्या राजकारणातील बदललेली समीकरणे पाहता, या गणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुशिक्षित आणि तरुण चेहरे रिंगणात उतरणार
यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांसोबतच अनेक सुशिक्षित आणि तरुण चेहरे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. शेतीचे प्रश्न, पाणी योजना, रस्त्यांची कामे आणि स्थानिक बेरोजगारी हे मुद्दे या गणात निर्णायक ठरणार आहेत.
वाड्या-वस्त्यांपर्यंत उमेदवारांची दमछाक
ओतूरसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावापासून ते रोहोकडीच्या डोंगरदऱ्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.”मतदारांच्या मनाचा कौल अद्याप गुलदस्त्यात असला तरी, इच्छुकांनी मात्र आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावून प्रचारात आघाडी घेतली आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी रंगीत तालीम मानली जात आहे.”






