Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

रायगड जिल्ह्यातील महाड तालुका परिसरात उभारण्यात येत असलेल्या कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणी कामावरून तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 04, 2026 | 04:25 PM
Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

Follow Us
Follow Us:
  • धरणाच्या घळभरणीला पुन्हा विरोध
  • बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
  • मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा
Raigad News: रायगड जिल्ह्यातील महाड तालुका परिसरात उभारण्यात येत असलेल्या कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणी कामावरून तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाही हेटवणे मध्यम प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने निवेदन देऊन देखील पुन्हा सुरू केल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून सर्व प्रकल्पग्रस्तांनी धरण क्षेत्रातच बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले आहे. प्रत्यक्ष लाभ आणि शंभर टक्के पुनर्वसनाशिवाय घळभरणी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कामाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, सकाळपासून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त धरण परिसरात जमले. प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती असून त्यांच्यामधील दरी दिवसेंदिवस या विषयावरून वाढत असल्याचे दिसून येत आहे. ते प्रकल्पाच्या दृष्टीने कदापी हिताचे नाही, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणे हे महाड तालुक्यासाठी अत्यंत गरजेचे असून यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री व स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या अधिकृत परिपत्रकानुसार शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय धरण घळभरणीचे काम न करण्याचे आदेश असताना देखील सरकारी नियमाला जुमानता प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही न पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत. उर्वरित लाभार्थ्यांना जमिनीचा मोबदला अथवा आर्थिक पॅकेज याबाबत ठोस निर्णय न झाल्याने असंतोष वाढला होता. दरम्यान, पाटबंधारे विभागाने घळभरणीचे काम पुन्हा सुरू केल्याने संतप्त ग्रामस्थांनी धरण क्षेत्रातच ठिय्या आंदोलन सुरू केले. काम तात्काळ बंद करावे, अशी अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या म्हणण्यानुसार, सर्व बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झालेले नाही. काही ६५% लाभार्थ्यांचे करार प्रलंबित असून जमीन मोबदला की आर्थिक पॅकेज याबाबत शासनाने स्पष्टता न केल्याने प्रथम पुनर्वसन, नंतर घळभरणी, या मागणीवर ते ठाम आहेत. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जोपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत धरणाच्या घळभरणीला विरोध कायम राहील, शासनाने जबरदस्ती काम सुरू केल्यास याच धरण क्षेत्रात आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

घटनास्थळी पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शासनाशी समन्वय साधून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, लेखी हमी व ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास जवळपास पुढील ५० वर्षे तरी महाड शहरासह परिसरातील ११ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून सिंचनक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. तरीही पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागल्याने प्रकल्पग्रस्त आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. धरण क्षेत्रातील ठिय्या आंदोलनामुळे सध्या कामकाज ठप्प झाले असून, या महत्वाकांक्षी जलप्रकल्पासाठी शासन आणि संबंधित विभाग आता कोणता तोडगा काढतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Indefinite sit in protest on kotheri medium irrigation project expectation of minister gogawales mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mahad
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
3

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…
4

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.