Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमधील घोड्यांच्या विष्ठा व्यवस्थापनाचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादात (NGT) गाजत आहे. या प्रकरणात नगरपरिषदेकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 01:53 PM
Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमधील घोड्यांच्या विष्ठेमुळे पर्यावरणाला धोका असल्याच्या याचिकेवर NGT मध्ये सुनावणी सुरू आहे.
  • नगरपरिषदेने ई-टेम्पो आणि यांत्रिक स्वच्छता वाहनांना परवानगी दिल्यास विष्ठा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
  • घोड्यांच्या संख्येवर नियंत्रण, तबेले स्थलांतर आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.
माथेरान: माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पर्यटनस्थळी असलेले पर्यावरण संतुलन राखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे सुरु असलेल्या केसची सुनावणी सध्या वेगाने सुरु आहे. या न्यायालयाकडे दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी वेगाने घेतली जात असून माथेरान शहरातील घोडे आणि त्यांची विष्टा हा प्रमुख मुद्दा माथेरानमधील वातावरण गरम करणारा ठरू पाहत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या याचिकेबाबत माथेरान नगरपरिषदेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते ते प्रतिज्ञापत्र सादर केले असून माथेरान पालिकेच्या भूमिकेवर न्यायालय कोणती भूमिका घेणार? याकडे घोडेवाले यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Nashik Rain Update: मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

माथेरानमधील सुनील शिंदे आणि केतन रामाणे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे एक याचिका दाखल केली आहे. त्यात माथेरानमधील घोड्यांची विष्ठा ही पर्यावरणाला धोका निर्माण करणारी आहे, असे मत मांडले आहे. त्या याचिकेनंतर हरित लवादाने घेतलेल्या सुनावणीनंतर माथेरान नगरपरिषदेला आपले मत प्रतिज्ञापत्र स्वरूपात मांडण्याचे आदेश जून महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानंतर माथेरान नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातगाड्यांच्या ऐवजी टप्प्याटप्प्याने ई-रिक्षा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

…तर विष्ठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल

जर या न्यायाधिकरणाने घोड्यांच्या विष्ठेचे संकलन करणे तसेच वाहतूक करण्यासाठी ई-टेम्पो (विद्युत मालवाहू वाहन) आणि यांत्रिक रस्ते स्वच्छता वाहने चालविण्यास परवानगी दिल्यास अधिक चांगल्या प्रकारे ही सर्व कामे कमी वेळात पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. नगरपरिषद घोड्यांच्या विष्ठा व्यवस्थापनाची योजना अधिक कार्यक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवू शकेल.

विष्ठेचे प्रमाणही कमी होईल

माल वाहतुकीसाठी ई-टेम्पो सुरू झाल्यास सध्या मालवाहतूक करणाऱ्या टट्टूची गरज कमी होईल. त्यामुळे माथेरानमधील घोड्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे निर्माण होणा-या विष्ठेचे प्रमाणही कमी होईल. तर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी घोडे हे माथेरानमधील अत्यावश्यक आणि प्रमुख वाहतुकीचे साधन राहतील, त्यामुळे कोणतीही उपाययोजना व्यवहार्य, अंमलात आणण्यास सक्षम आणि प्रवासी वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम करणारी नसावी, असे नमूद केले आहे.

अभ्यास सुरू असून १६ ऑगस्टला पुढील सुनावणी

या विषयी हरित लवाद यांच्याकडे एक समिती गठीत करण्यात आली आहे. पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अशी ही समिती त्यावर निर्णय घेणार आहे. या समितीने माथेरानमधील हवा, पिण्याचे पाणी, माती आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादास काही सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून देखील याबाबत अभ्यास सुरु असून १६ ऑगस्ट रोजी या याचिकेची पुढील सुनावणी राष्ट्रीय हरित लवाद घेणार आहे.

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

या केल्या महत्वाच्या सूचना

  • घोड्यांच्या संख्येवर कठोर नियंत्रण ठेवून ती टप्प्याटप्प्याने कमी करणे.
  • घोड्यांचे तबेले पर्यावरण-संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर स्थलांतरित करणे.
  • जंगलात असलेल्या जलस्रोतांचे संरक्षण करणे.
  • या नियमांची पुढील ३ ते ५ वर्षे सातत्याने निरीक्षण करून परिणामाची पडताळणी करणे.
  • ही विष्ठा नेमकी कुठे नेली जाईल, तिच्यावर पुढे कोणती प्रक्रिया करण्याबाबत सर्वेक्षण करावे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran horse dung case ngt hearing focuses on environmental protection raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा
1

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना! मुंबईत मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना! मुंबईत मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा
3

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव
4

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.