Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

माथेरानमध्ये शार्लोट लेकमधून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी वितरित केल्याचा गंभीर आरोप केला असून, नगरपरिषदेच्या तपासणीत 80 टक्के पाणी दूषित आढळल्याचा दावा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 11:45 AM
माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • शार्लोट लेकचे दूषित पाणी थेट नळातून?
  • माथेरानमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
  • माथेरानमध्ये जलशुद्धीकरणावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी
Matheran News Marathi : माथेरान शहरात सध्या शार्लोट लेकमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र सततच्या पावसामुळे तलावातील पाणी गढूळ झाले असून, तेच पाणी नागरिकांना नळाद्वारे पुरवले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रिटिशकालीन शार्लोट लेक हा माथेरान शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. पर्यटनस्थळ म्हणून माथेरानचा विकास झाल्यानंतर वाढत्या लोकसंख्येचा आणि पर्यटकांचा विचार करून उल्हास नदीवरूनही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र पावसाळ्यात उल्हास नदीवरील पाणीउपसा बंद ठेवला जात असल्याने संपूर्ण अवलंबित्व शार्लोट लेकवर असते.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया करूनच नागरिकांना वितरित केले जाते. मात्र प्रत्यक्षात नळाद्वारे येणारे पाणी दूषित आणि गढूळ असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर गंभीर आरोप करत जलशुद्धीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाणी शुद्धीकरण केंद्रात पूर्ण प्रक्रिया न करताच थेट शहरात पाणी सोडले जात आहे. तसेच पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी ठेकेदाराकडे देण्यात आली असून, आवश्यक जंतुनाशकांचा वापर न करताच पाणी वितरित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याशिवाय, माथेरानसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी कार्यरत असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी केवळ पाणीपट्टी वसूल करण्यापुरतेच येतात, असा आरोपही पारटे यांनी केला. सहायक अभियंता आणि शाखा अभियंता हे पूर्णवेळ शहरात उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याची टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान, माथेरान नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या पाणी तपासणीत सुमारे 80 टक्के नमुने दूषित आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.

Matheran Accident : माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

Web Title: Matheran muddy water supply health risk charlotte lake maharashtra jeevan pradhikaran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • Water Issue

संबंधित बातम्या

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?
1

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा
2

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात
3

Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी
4

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.