माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रविवारी पर्यटकांनी फुलून आले होते. त्यावेळी पर्यटक यांना सायंकाळी येताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. तेथे किमान दीड ते दोन तास टॅक्सी मिळावी यासाठी वाट पाहावी लागत होती. पर्यटकांच्या रांगा लांबत चालल्या होत्या आणि त्यामुळे अखेर पर्यटकांना मिळेल त्या वाहनांचा सहारा घेऊन नेरळ येथे यावे लागत होते. प्रवासी टॅक्सी यांची गर्दी आणि त्यात पर्यटकांची वाहनांमुळे माथेरान नेरळ घाट पर्यटकांनी व्यापून गेला होता.वाहनांची वाट पाहत असलेल्या पर्यटकांनी माथेरान येथून खाली नेरळ येथे जात असलेल्या टेम्पोचा सहारा घेतला. मालवाहू टेम्पो क्रमांक एम एच 05 एफ जे 7414 या वाहनातून त्यावेळी साधारण 17 ते 18 प्रवासी प्रवास करू लागले आणि हा टेम्पो त्या प्रवाशांना घेऊन नेरळ कडे येऊ लागला.नेरळ कडे येत असताना जुम्मापट्टी नंतर रस्त्यावरून पुढे येत असताना रस्त्याच्या एका कडेला कलंडला आणि त्या टेम्पोला अपघात झाला.
रस्त्यावर उलटा झालेल्या टेम्पोमध्ये प्रवास करीत असलेली 17 ते 18 पर्यटक यांच्यापैकी सात ते आठ जण जखमी झाले.त्यावेळी नेरळ टॅक्सी संघटनेचे कार्यकर्त्यांना रस्त्यावर पालटलेले टेम्पो सुस्थितीत आणण्यासाठी आणि जखमींना उपचारासाठी तत्काळ सेवा देण्याचे काम केले.त्या जखमी प्रवाशांना गाडी मधून डॉ सरोदे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या टेम्पोमधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने अद्याप पोलिसांना आपले जबाब दिले नाहीत. त्यामुळे नेरळ पोलिसांकडून होणारी कार्यवाही अर्धवट राहिली असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आज सकाळी सात जखमी यांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.






