Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर

Matheran News: माथेरानमधील शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. माथेरान नगरपरिषदेकडून गाळ काढण्यासाठी मजूर लावण्यात आले असून, जुन्याच पद्धतीने काम केले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, गाळ काढण्यापूर्वी पाणी कशासाठी सोडण्यात आले आणि या प्रकाराला जबाबदार कोण?

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 01:11 PM
माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर

माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर

Follow Us
Follow Us:
  • शार्लोट लेकचा गाळ काढण्यास सुरुवात
  • जुन्याच पद्धतीने काम सुरू
  • माजी नगराध्यक्षांचा संतप्त सवाल
 

माथेरान: माथेरान शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ब्रिटिशांनी धरण बांधले. त्या शार्लोट लेक या धरणातील पाणी ठेकेदाराला फायदा व्हावा म्हणून सोडून देण्यात आले.त्यानंतर प्रचंड वादंग निर्माण झाला असून अखेर माथेरान नगरपरिषदेला जाग आली आहे. पालिकेने नेमलेली ठेकेदाराने आता मनुष्यबळ वापरून जुन्या प्रथेनुसार तलावातील माती काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,काल पासून 50 मजूर गाळ काढण्याचे काम करीत असून पाणी कशासाठी सोडले आणि विना परवाना पाणी सोडणाऱ्यावर शासन कोणती कारवाई करणार आहे? असा संतप्त सवाल माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी उपस्थित केला आहे.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

माथेरान पालिकेच्या मालकीचे शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.या लेक मधील पाण्याची मालकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे आहे. असे असताना माथेरान पालिकेने धरणातील पाणी सोडल्यावर माती गाळ वाहून जाईल या हेतूने धरणातील पाणी 10 ऑगस्ट रोजी सोडून दिले.धरणातील माती वाहून गेली की धरणाचे ठेका घेणाऱ्या ठेकेदाराचा फायदा होणार होता. धरणातील पाणी सोडले पण धरणातील माती हवी तेवढ्या प्रमाणात वाहून गेली नाही आणि माथेरान नगरपरिषदेचा पाणी सोडण्याचा प्रयोग फसला आहे. धरणात माती तशीच राहिल्याने आणि तशीच राहिली आहे.त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेली माथेरान नगरपरिषद जागी झाली आहे. 2013 पूर्वी पूर्वापार प्रमाणे माथेरान मध्ये शार्लोट लेक मधील पाणी कमी झाल्यावर लेक मधील गाळ मनुष्यबळ वापरून काढला जात होता.

मात्र 2013 माथेरानचे शार्लोट लेक मधील गाळ काढण्यात आला नसल्याने हा गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.धरणातील पाण्यासोबत गाळ वाहून जाईल म्हणून धरणातील पाणी सोडले मात्र गाळ आहे तसाच आहे.ही बाब लक्षात आल्यानंतर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी गंभीर दखल घेतली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेला जाब विचारला आणि त्यामुळे माथेरान नगरपरिषदेला खडबडून जाग आली.शेवटी माथेरान पालिकेने ठेकेदाराला आदेश देत मनुष्यबळ वापरून गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. काल पासून शार्लोट लेक मध्ये 50 ते 60 मजूर गाळ काढण्यात व्यस्त आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

मजूर किती दिवस गाळ काढणार?

सध्या पावसाळा सुरू असल्याने मनुष्यबळ वापरून काढला जाणारा गाळ यांच्यात अडचणी येऊ शकतात.जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्यात आला असता तर मे अखेर पर्यंत गाळ धरण गालमुक्त होऊ शकले असते.

जानेवारी 2026 मध्ये गाळ काढण्याचे पैसे काढले गेले,तो गाळ त्यावेळी काढला असता तर आता माथेरान पालिकेला मनुष्यबळ वापरून गाळ काढण्याची वेळ आली नसती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी सोडून गाळ काढण्याची वेळ माथेरान पालिकेवर आली आहे.याला जबाबदार असलेली व्यक्ती आणि संस्था यांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी  माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केली.

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

Web Title: Matheran municipal council charlotte lake silt removal khedkar question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • matheran news
  • raigad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.