Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

Tribal Ashram School: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणासाठी खराब दर्जाच्या भाजीपाल्याचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराविरोधात आदिवासी ठाकूर समाज संघटना आक्रमक झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 02:31 PM
विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
  • खराब भाजीपाल्याच्या वापराचा आरोप
  • निकृष्ट भाजीपाल्यावरून ठाकूर समाज संघटना आक्रमक
कर्जत: कर्जत तालुक्यात चार शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहेत. या चार शासकीय आश्रमशाळा मध्ये भाजीपाला पुरवठा करणाऱ्या ठेकेदार याच्याकडून नित्कृष्ट दर्जाचा आणि खराब भाजीपाला यांचा पुरवठा होत आहे. याबाबत कर्जत तालुका आदिवासी ठाकूर संघटना आक्रमक झाली असून नित्कृष्ट भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. या तालुक्यात चार शासकीय आश्रम शाळा आहेत.चाफेवाडी, पिंगळस,भालिवडी,पाथरज या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याच्या दर्जाबाबत आणि पुरवठ्याच्या वेळेबाबत कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिंता वाटत आहे.कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आश्रम शाळांना रात्रीची अचानक भेटी दिल्या आहेत.

Rising Education Cost in India: शिक्षण घेणे झाले महाग! फक्त शाळा-कॉलेजची फी नव्हे, तर ‘या’ खर्चांमुळे पालकांचे बजेट कोलमडणार

आदिवासी आश्रमशाळेत राहून निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ही धाड पालक आणि आदिवासी संघटनेचे कार्यकर्त्यांनी टाकली.आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या सचिव नितीन निरगुडा आणि कार्यकर्त्यांनी पालकांसह रात्रीच्या वेळी काही आदिवासी आश्रमशाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याची पाहणी केली असता या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वापरण्यात येणारा भाजीपाला दररोज ताजा असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि ताजा आहार देणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनी भाजीपाल्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.आठवड्यात दर गुरुवारी शाळांमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील पुरवठा सोमवारी करण्यात आल्याने जवळपास चार दिवस नवीन भाजीपाला उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत.

याबाबत शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडून योग्य प्रकारे देखरेख केली जात नाही असे दिसून आले आहे.पालक आणि कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेने उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत संबंधित अधिकारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण होणार का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केलेल्या भाजीपाल्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसून आहे असा दावा केला आहे.

भाजीपाल्याची गाडीचे वेळापत्रक नियमबाह्य..

तसेच भाजीपाला वाहतूक करणारी गाडी पहाटेच्या सुमारास शाळांमध्ये पोहोचणे अपेक्षित असताना ती रात्री साडेआठच्या सुमारास शाळांमध्ये पोहोचत असल्याचेही समोर आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि ताजा आहार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कर्जत तालुक आदिवासी ठाकूर समाज संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आश्रम शाळांमधील आहार व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.

सचिव आदिवासी ठाकूर संघटना कर्जत

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रात्रीचे जेवण दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता दिला जातो. मात्र भाजीपाला रात्री उशिरा पोहोचत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

Web Title: Tribal ashram school students health risk poor quality vegetables thakur community protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • education news
  • maharashtra
  • School

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
1

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
2

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
3

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती
4

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.