Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: ‘ग्राउंड रियालिटी’ तपासा; माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

योग्य आणि विश्वासात्मक आश्वासन मिळाल्यानंतर माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे स्थगित करण्यात आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 09:18 PM
माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

Follow Us
Follow Us:

संतोष पेरणे/ माथेरान: माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेले उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्याय मिळावा तसेच शहराच्या पर्यटनवाढीसाठी वास्तविक परिस्थिती (ग्राउंड रियालिटी) शासनासमोर मांडावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. माथेरानमध्ये 94 नव्हे तर किमान 200 पर्यावरणपूरक ई-रिक्षांची गरज असल्याचा दावा त्यांनी केला.

पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी उपसमितीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि पुढे संनियंत्रण समितीच्या बैठकीत तो ठामपणे मांडला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत उपसमितीची आणि त्यानंतर संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

Ahilyanagar News: अशोक खरात यांचे शिर्डी-राहता कनेक्शन; तब्बल 2000 कोटींच्या संपत्तीचा अंदाज

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महसूल अधीक्षक सुरेंद्र ठाकूर यांनी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे पत्र सादर केले. यावेळी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे, पोलीस अधिकारी सरिता मुसळे आदी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार 28 किंवा 30 मार्च रोजी उपसमितीची बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली जाईल आणि त्यानंतर संनियंत्रण समिती अंतिम निर्णय घेईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

यावेळी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख कुलदीप जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, सुहासिनी शिंदे तसेच श्रमिक रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, सचिव सुनील शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

उपोषणकर्ते दिनेश सुतार यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, “आमच्या मागण्या शासन समजून घेत नाही. 94 अधिकृत हातरिक्षा चालक असताना प्रशासनाने 80 हा आकडा का दिला? आम्ही परवाना घेऊन कर भरत असताना आमची नावे वगळली का?” असा सवाल उपस्थित केला. काहींना पात्र ठरवून इतरांना वगळण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Ahilyanagar News: ‘ती’ एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी, “94 परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते, तर सर्व पात्र चालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात याव्यात,” अशी मागणी केली. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी हातरिक्षा चालकांच्या बाजूने भूमिका मांडली, तर मनोज खेडकर यांनी ई-रिक्षांची संख्या ठरवताना स्थानिक हॉटेल व्यवसाय, दुकानदार, मजूर यांचाही विचार व्हावा, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने सुरेंद्र ठाकूर यांनी सर्व माहिती एकत्रित करून अहवाल तयार केला जाईल, असे सांगितले. राहुल इंगळे यांनीही प्रथम योग्य संख्या निश्चित करणे गरजेचे असून खऱ्या चालकांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. सध्या 80 चालकांना ई-रिक्षा देण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेवटी, “आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, गरज पडल्यास आदेश धुडकावून रिक्षा रस्त्यावर आणू, आणि शेवटपर्यंत लढा देऊ,” असा इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.

Web Title: Matheran news hand rickshaw drivers hunger strike called off after assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Matheran
  • matheran news

संबंधित बातम्या

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
1

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
2

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.