Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Matheran News: माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर पुढील एका महिन्यात सकारात्मक बदल दिसतील, असे आश्वासन त्यांनी आढावा बैठकीत दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 05:35 PM
विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • माथेरानच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी आणणार
  • आमदार महेंद्र थोरवे यांची ग्वाही
  • आढावा बैठकीत आमदार थोरवे यांचे आश्वासन
माथेरान: जागतिक दर्जाचे पर्यटन असलेल्या माथेरान मधील समस्यांबाबत येत्या महिन्याभरात सकारात्मक बदल झालेले दिसतील असा विश्वास आमदार थोरवे यांनी नगरपरिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केला.तर शहराच्या विकासासाठी आणि शहराला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी शेकडो कोटींचा निधी आणायचा आहे असे आश्वासन यावेळी दिले

पर्यटनस्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या माथेरानसमोर सध्या अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर दुसरीकडे शार्लोट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने स्वच्छ पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचा दौरा करत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

माथेरान नगरपरिषद कार्यालयात यानिमित्ताने विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार थोरवे यांचेसह नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, गटनेते शिवाजी शिंदे, मुख्याधिकारी राहुल इंगळे,माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. बैठकीदरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व नगरसेवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी त्यांनी माथेरान शहरामधील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शार्लोट तलावातील गाळ काढण्याचे काम, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा यावर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार थोरवे यांनी जाहीर केले.पुढील 30 दिवसांत माथेरानमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी आणायचा आहे.त्यात माथेरान शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनावे यासाठी आणि माथेरान शहराचे रूप पर्यावरण समतोल राखत जपण्यासाठी”माथेरानच्या विकासासाठी 800 ते 1000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी थोरवे यांनी दिली.

प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याची नाराजी अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली.यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि संबंधित प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मला कुठलेही कारण नको,नागरिकांच्या कामात दिरंगाई किंवा बेफिकिरी अजिबात सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कामाला लागावे,” अशी स्पष्ट आणि सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

Web Title: Mla mahendra thorve assures hundreds of crores for matheran development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mahendra Thorve
  • Matheran

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.