Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

देशात मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाणीटंचाई आणि उकाड्याच्या समस्याही अधिक गंभीर होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 01:35 PM
Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

Follow Us
Follow Us:
  • मान्सूनची वाटचाल मंदावल्याने रायगड जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झाला नसून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
  • पावसाअभावी धरणे, तलाव आणि विहिरींतील जलसाठा कमी झाला असून अनेक गावे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
  • भात पेरणीची तयारी पूर्ण असूनही पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना पेरणीचे वेळापत्रक बिघडण्याची चिंता सतावत आहे.
अलिबाग: यंदा देशात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरी रायगड जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनचा प्रवास मंदावल्याने जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली असून पावसाअभावी भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. वाढत्या उकाड्‌यामुळे नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.

Mumbai News: मुंबई महापालिकेचा ‘एआय’ दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

हवामान खात्याने मान्सून १० जूनपर्यंत मुंबई परिसरात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र १२ जून उजाडूनही रायगडसह कोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा पाऊस अद्याप पोहोचलेला नाही. केरळ आणि त्यानंतर सिंधुदुर्गात वेळेवर दाखल झालेला मान्सून पुढे सरकताना मंदावल्याने तो सध्या रत्नागिरी परिसरातच थांबलेला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रायगडकरांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण, पुन्हा उन्हाचा कडाका

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी त्यातून अपेक्षित पाऊस पडत नाही. काही वेळ ढग दाटून येतात, विजांचा कडकडाटही होतो. मात्र, त्यानंतर पुन्हा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता वाढून नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

जलसाठा झाला कमी

पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनले आहे, अनेक धरणे, तलाव आणि विहिरींमधील जलसाठा कमी झाला असून जिल्ह्यातील शेकडो गावे आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून पावसाचा प्रत्येक दिवस उशिरा होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे.

पेरणीचे वेळापत्रक बिघडण्याची भीती

रायगड हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर अवलंबून आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शेतकरी पेरणीसाठी आवश्यक तयारी करूनही प्रत्यक्ष कामे सुरू करू शकलेले नाहीत. पाऊस आणखी उशिरा झाल्यास पेरणीचे वेळापत्रक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मान्सून आता काही दिवसांत दाखलची अपेक्षा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली होती. या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सून आता काही दिवसांत दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

शेतकरी व प्रशासनाचे लक्ष आकाशाकडे लागले

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सूनच्या वाटचालीस पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात लवकरच मान्सून दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत मात्र शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आकाशाकडे लागून राहणार आहे.

Web Title: Monsoon delay worries raigad farmers await rain as water crisis deepens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Alibaug
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
1

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
2

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास
3

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
4

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.