Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : खारघर शहर दारुमुक्त व्हावं म्हणून स्थानिक आमदाराचा पुढाकार; संघर्ष समितीचे एकदिवसीय उपोषण मागे

खारघर शहराची ओळख दारुमुक्त शहर म्हणून कायमच रहावी यासाठी संघर्ष समितीने एकदिवसीय उपोषण जाहीर केले होते. याबाबत पुढाकार घेत स्थानिक आमदगाराने संघर्ष समितीशी संवाद साधला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 20, 2025 | 03:04 PM
Navi Mumbai News : खारघर शहर दारुमुक्त व्हावं म्हणून स्थानिक आमदाराचा पुढाकार; संघर्ष समितीचे एकदिवसीय उपोषण मागे
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल ग्रामीण पालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर अशी असून गेल्या अनेक वर्षात ही ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही काही धन दांडग्या व्यावसायिकांनी दारू विक्रीचे परवाने मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खारघर संघर्ष समितीच्या सततच्या विरोधामुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.

मात्र, मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा काही मंडळी दारू विक्रीचे परवाने मिळवण्यासाठी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खारघर संघर्ष समितीच्या वतीने काल शिल्प चौक, खारघर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था व विविध संघटनांनी उपोषण स्थळावर जाऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बससेवांचा तुटवडा

आमदार विक्रांत पाटील यांनी खारघर शहर दारूमुक्त रहावे, ही मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आक्रमक पणे मांडली होती. यानंतर त्यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले. उपोषणाच्या दिवशी त्यांनी स्वत: उपोषण स्थळी भेट देऊन खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

या दरम्यान,  आमदार विक्रांत दादा पाटील यांनी उपोषणकर्त्यांना धीर देत “खारघरची दारूमुक्त शहर ” ही सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी मी प्रशासनाशी अधिक ताकदीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले तसेच खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन संघर्ष समितीने आपले एक दिवसीय उपोषण सध्या मागे घेतले आहे.

खारघरच्या दारूमुक्त ओळखीला कुणीही धक्का लावू नये, ही आमची भूमिका स्पष्ट आहे आणि खारघर संघर्ष समितीच्या दारू मुक्त शहर या मागणीला पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी दिली आहे.

Web Title: Navi mumbai news local mlas initiative to make kharghar city alcohol free sangharsh samitis one day hunger strike called off

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Alcohol
  • Navi Mumbai
  • panvel

संबंधित बातम्या

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
1

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा
2

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
3

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
4

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.