Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत अवैध नळजोडणी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ४३ अवैध नळजोडण्यांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही आणखी एक बेकायदा जोडणी समोर आल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 04:17 PM
प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

Follow Us
Follow Us:
  • नेरळ ग्रामपंचायती मधील नळजोडणी मधील गैरव्यवहार कायम
  • पंचायत समिती सदस्यांनी उघड केला गैरव्यवहार
  • ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील प्रशासक राजवटीत भ्रष्टाचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. लोकनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्याकडून तब्बल ४३ अवैद्य नळजोडण्या यांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर देखील पाणी पुरवठा विभाग सुधारण्याचे नाव घेत नाहीत. कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी आणखी एक नळजोडणी उघडकीस आणली असून त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी नियमानुसार कार्यवाही व्हावी असे आदेश दिले असून अवैध नळजोडणी प्रकरणी गटविकास अधिकारी कोणती कारवाई करतात,याकडे लक्ष लागले आहे.

म्हसवडमध्ये पाणी संकट गडद! ८० कोटींच्या नवीन योजनेच्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप

नेरळ ग्रामपंचायत मध्ये असलेल्या प्रशासक राजवटीत अवैध नळजोडणी करण्याचे अनेक प्रकार मागील तीन चार महिन्यात उघडकीस आले आहेत.तर १५ लाखाच्या कचरा कुंड्या लपवून ठेवण्याचा प्रकार देखील उघडकीस आणण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर नव्याने जिल्हा निवडून गेलेल्या सदस्यांना यश आले आहे.त्यात मागील तीन महिन्यात तब्बल ४३ नळजोडण्या यांची कोणतीही नोंद नसल्याने त्या नळजोडण्या कापून टाकण्यात आल्या आहेत.त्यानंतर देखील नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्यपध्दती मध्ये सुधारणा होत नसल्याने नेरळ ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असल्याचे सिद्ध झाले आहे.हा प्रकार अद्याप थांबलेला आहे असे वाटत असताना कर्जत पंचायत समिती चे सदस्य यांनी पाणी पुरवठा विभागाचा आणखी एक प्रताप समोर आणला आहे.या विभागाचे कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ३५ हजार रुपयांचे आमिषावर नळजोडणी दिली होती.ती नळजोडणी देताना नेरळ ग्रामपंचायत ची पाणी जोडणी मंजुरी देखील नसल्याची माहिती मिळताच भगवान चंचे हे ग्रामपंचायत कार्यालयात पोहचले.

संबंधित नळजोडणी बाबत कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी तत्काळ ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्याकडे संबंधित नळजोडणी बाबत परवाना पत्र यांची मागणी केली.मात्र कोणत्याही प्रकारचे परवाना पत्र नसताना आणि ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागात त्या नळजोडणीची नोंद नसल्याने तत्काळ संबंधित नळजोडणी कापण्यास सांगितले.तसेच ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याने भगवान चंचे हे कर्जत पंचायत समिती मध्ये पोहचले आणि गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांची भेट घेतली.त्या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.त्या वेळी प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या बाबत गटविकास अधिकारी यांनी अवैध नळजोडणी प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भगवान चंचे यांनी केली.गटविकास अधिकारी यांनी नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असून मागील दोन महिन्यापूर्वी उघडकीस आलेला ४३ नळजोडणी यांचा भ्रष्टाचार बाबत कधी कारवाई करणार असा सवाल भगवान चंचे यांनी उपस्थित केला आहे.

Siddhivinayak Corridor Project : सिद्धिविनायक कॉरिडॉरच्या पार्किंग योजनेवर स्थानिकांचा संताप; मैदान बचावासाठी मोठे आंदोलन

Web Title: Neral gram panchayat illegal water connections corruption action demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
2

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी
3

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार
4

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.