Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांची पहिली पसंती; हेरिटेज मानांकनाची प्रतीक्षा कायम

नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन ही माथेरान पर्यटनाचा आर्थिक कणा मानली जाते. २१ किलोमीटरचा प्रवास करत तब्बल २२० वळणे घेत ८०० मीटर उंच माथेरानपर्यंत पोहोचणारी ही नॅरोगेज मिनी ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरते. यंदा अनेक वर्षांनी पर्यटकांना चांगली सेवा मिळत असली तरी या ऐतिहासिक रेल्वेला ‘हेरिटेज’ दर्जा कधी मिळणार?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 13, 2026 | 12:34 PM
माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांची पहिली पसंती; हेरिटेज मानांकनाची प्रतीक्षा कायम

माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांची पहिली पसंती; हेरिटेज मानांकनाची प्रतीक्षा कायम

Follow Us
Follow Us:
  • माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांची पहिली पसंती
  • हेरिटेज मानांकनाची प्रतीक्षा कायम
  • नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनने पूर्ण हंगाम प्रवाशांच्या गर्दीचा
माथेरान : नॅरोगेजवर चालणारी नेरळ माथेरान नेरळ ही माथेरान येथील पर्यटनस्थळाचा आर्थिक कणा समजली जाते.यावर्षी अनेक वर्षांनी ही मिनी ट्रेन पर्यटकांना चांगली सेवा देणारी ठरली आहे. संपूर्ण उन्हाळी हंगाम पर्यटकांची गर्दी वाहून नेणारी मिनीट्रेन हेरिटेज नामांकन कधी मिळवणार? हा प्रश्न कायम आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास माथेरान या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हवाहवासा वाटत असतो.२१ किलोमीटर अंतर पार करीत असताना ही मिनीट्रेन तब्बल २२० वळणे घेऊन माथेरान येथे पोहचत असते.८०० मीटर उंचीवर असलेल्या माथेरान शहरात घेऊन जाणारी ही मिनीट्रेन त्यामुळेच आबालवृद्ध पर्यटकांची आवडती ठरत असते.

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

माथेरान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची मिनी ट्रेन मधून प्रवास करण्याची इच्छा असते.त्यामुळे नेरळ जंक्शन स्थानकातून येथून सुटणाऱ्या नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी भल्या पहाटे पर्यटक तिकीट घराजवळ येऊन बसतात.त्यामुळे मिनी ट्रेनचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी गाडीचे डब्बे आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे.माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून जाणारी मिनिट्रेन या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे.त्यात गेल्या काही वर्षांपासून नेरळ-माथेरान-नेरळ हि मिनीट्रेन सेवेचे ऑनलाईन तिकीट बंद आहे.त्यामुळे पर्यटक भल्या पहाटे येऊन गाडीची तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरज

नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील सात आठ महिने सातत्याने दोन फेऱ्या चालवल्या गेल्या आहेत. नेरळ येथून सकाळी दोन गाड्या सोडण्यात येतात आणि त्या गाड्या दुपार नंतर माथेरान येथून नेरळ करिता सोडल्या जातात. मिनी ट्रेनच्या केवळ दोन फेऱ्या चालवल्या जात असल्याने अवघे ४०० प्रवासी दिवसभरात प्रवास करीत असतात.त्यामुळे नेरळ येथून दिवसभरात किमान चार फेऱ्या मिनी ट्रेनच्या व्हाव्यात अशी मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे.या गाड्या चालवण्यासाठी रेल्वे कडे नेरळ लोको येथे किमान आठ इंजिन आहेत.असे असताना देखील गाड्या वाढवण्यात येत नसल्याने पर्यटक आणि स्थानिक गाड्या वाढवण्याची मागणी करीत असतात.पुढील हंगामापासून तरी मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जातील अशी अपेक्षा पर्यटकांना आहे.

माथेरानकरांचा आर्थिक कणा

जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख असल्यामुळे पर्यटक माथेरानला पहिली पसंती देत असतात.एप्रिल आणि मे महिना माथेरान पर्यटन हंगामाचा महत्वाचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन हॉटेल व्यावसायिक उतरल्याने माथेरान पर्यटकांच्या सेवेसह सज्ज झाले आहे.शाळांना असलेल्या सुट्ट्या आणि माथेरान मधील थंड हवामान लक्षात घेता आणि मुंबई पासून जवळ असल्याने पर्यटक माथेरानला पसंती देत असतात.

जागतिक वारसा यादी

नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन चा समावेश व्हावा यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडून नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रक,या मार्गावरील सर्व स्थानके, मिनीट्रेन च्या दिमतीला असलेली वाफेवर तसेच नव्याने बांधलेली इंजिने आणि माथेरान स्थानक हे हेरिटेज वास्तूत समाविष्ट होणार आहे.त्यामुळे मिनीट्रेन बरोबर माथेरानचा वारसा सांगणारी परंपरा यांना देखील स्थान देऊन माथेरानला जगभरातून येणारे पर्यटक यांना आकर्षित करण्याचे महत्वाचे काम रेल्वे आणि माथेरान गिरिस्थान नगरपरिषद करू पाहत आहे.

विदेशी पर्यटकांना आकर्षण

विदेशी पर्यटक मागील काही वर्षात फार कमी प्रमाणात माथेरान कडे फिरकत नाहीत. त्यात माथेरान चे पर्यटन आणि मिनीट्रेन हे समीकरण अनेक दशके सुरु आहे. त्यामुळे मिनिट्रेन सुरूच राहावी हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Web Title: Neral matheran mini train heritage status tourism railway news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Matheran
  • matheran news
  • tourism
  • Train

संबंधित बातम्या

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
1

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
2

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’
3

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
4

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.