Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'प्रस्तावित कारवाईनंतर पुढे काय?' आणि 'अंतिम कारवाई कधी?' असा प्रश्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश खराडे यांनी उपस्थित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 02:42 PM
Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आरटीआय दाखल
  • प्रस्तावित कारवाईपर्यंत विषय मर्यादित राहू नये, दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार ठोस कारवाई झाली पाहिजे – राकेश खराडे
रसायनी: खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे नदी आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश खराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून सांडपाण्याचे नमुने घ्यावेत, त्यांची शास्त्रीय तपासणी करावी आणि अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

अद्याप अंतिम कारवाई स्पष्टपणे समोर आली नसल्याचा दावा

काही उद्योगांच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी, सुनावणी व पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असतानाही अद्याप अंतिम कारवाई स्पष्टपणे समोर आलेली नाही, असा दावा खराडे यांनी केला आहे. त्यामुळे ‘प्रस्तावित कारवाईनंतर पुढे काय?’ आणि ‘अंतिम कारवाई कधी?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आरटीआय दाखल केला आहे.

शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार, द बॉम्बे डायिंग ॲड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (पॉलिस्टर विभाग), गतिक सिंथेसिस एलएलपी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एलएबी विभाग) यांच्या पाहणीदरम्यान पर्यावरणीय अटी व नियमांशी संबंधित विविध निरीक्षणे नोंदविण्यात आल्याचे नमूद आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एलएबी विभाग) संदर्भातील पाहणीमध्ये सांडपाणी व पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र संकलन व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तसेच पाण्याच्या पृष्ठभागावर आढळलेल्या तेलकट थरासह विविध बाबीची नोंद करण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद आहे. गतिक सिंथेसिस एलएलपी संदर्भात एटीएफडी यंत्रणा कार्यरत नसणे, घातक कचऱ्याच्या साठवणुकीशी संबंधित बाबी तसेच धोकादायक कचरा साठवणूक परिसरातील व्यवस्थापनाबाबत निरीक्षणे नोंदविण्यात आल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

आता माहिती अधिकारातून मागविला सविस्तर अहवाल

प्रदूषणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित उद्योगांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, किती उद्योगांची तपासणी झाली, तपासणीदरम्यान कोणते नमुने घेण्यात आले, त्यांचे प्रयोगशाळा अहवाल काय आहेत, नोटिसा व सुनावण्यांनंतर पुढील निर्णय काय झाले, तसेच प्रस्तावित कारवाईची सद्यस्थिती काय आहे, याबाबत राकेश खराडे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत एमपीसीबीकडे सविस्तर माहिती मागविली आहे.

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

संबंधित उद्योगाच्या इटीपी यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे, सांडपाण्याचे नियमित नमुने घेणे, सीइटीपीमधील प्रक्रिया व्यवस्थेची तपासणी करणे, नदीच्या पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी करणे आणि तपासणी अहवाल पारदर्शकपणे उपलब्ध करून देणे, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे. तसेच खराडे यांनीही पाहणीमध्ये नियमभंग अथवा पर्यावरणीय त्रुटी आढळल्या असतील तर त्यानंतर संबंधित आस्थापनांवर नेमकी कोणती अंतिम कारवाई झाली, हे जनतेला समजले पाहिजे. केवळ नोटिसा, सुनावणी किंवा प्रस्तावित कारवाईपर्यंत विषय मर्यादित राहू नये, दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Patalganga river pollution issue escalates journalist association seeks final action report from mpcb hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
1

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
2

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
3

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ
4

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.