
समुद्रात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे सहलीसाठी आली होती. समुद्रात गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने 8 ते 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सहलीसाठी 44 विद्यार्थी आणि 2 शिक्षक आल्याचे म्हटले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
हे… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 1, 2026
काय म्हणले मुख्यमंत्री फडणवीस?
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून, त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत.