Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ‘म्युल अकाऊंट’ धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

रायगड जिल्ह्यात वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. म्युल अकाऊंटच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांव लक्ष ठेवत अनेक संशयास्पद खात्यांचा तपास करण्यात येत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 08:57 AM
Raigad News: 'म्युल अकाऊंट' धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

Raigad News: 'म्युल अकाऊंट' धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

Follow Us
Follow Us:
  • रायगड पोलिसांनी म्युल अकाऊंट धारकांविरोधात कारवाई करत २३ गुन्हे दाखल केले असून ३५ कोटींहून अधिक सायबर फसवणुकीचा उलगडा केला आहे.
  • सायबर फसवणुकीतील पैशांच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या संशयास्पद बँक खात्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
  • नागरिकांनी आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा वैयक्तिक माहिती इतरांना देऊ नये, असे रायगड पोलिसांनी आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यात वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘म्युल अकाऊंट’ धारकांविरोधात व्यापक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमधून तब्बल ३५ कोटी ३० लाख ९७ हजार ७६६ रुपयांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा झाला असून या प्रकरणांचा तपास वेगाने सुरू आहे.

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

सायबर गुन्हेगार गुंतवणुकीवरील मोठा परतावा, अर्धवेळ नोकरी, डिजिटल अटक, शेअर मार्केट आणि विविध ऑनलाइन आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करतात. फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या खात्यात न ठेवता इतरांच्या बँक खात्यांचा वापर करून व्यवहार केली जाते. अशा खात्यांना ‘म्युल अकाऊंट’ म्हटले जाते. खातेधारकांकडून पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक व इतर बँकिंग माहिती घेऊन त्यांचा वापर सायबर गुन्ह्यांतील पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest)

एनसीआरपी पोर्टलवरील तक्रारी, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा मागोवा आणि बँक व्यवहारांच्या विश्लेषणातून अनेक संशयास्पद खात्यांचा शोध घेण्यात आला. या खात्यांमध्ये मागील काही महिन्यांत लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात स्वतःची बँक खाती इतरांना वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित म्युल अकाऊंट धारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. २७ जुलै २०२६ पर्यंत अशा २३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व म्युल अकाऊंट धारकांविरोधात कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सायबर पोलीस ठाण्यासह श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, नागोठणे, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण आणि कोलाड पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. या प्रकरणांतील म्युल अकाऊंट धारकांचे बँक स्टेटमेंट आणि व्यवहारांची तपासणी सुरू असून जिल्ह्याबाहेरील तसेच राज्यातील इतर गुन्ह्यांशी त्यांचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २४ जुलै रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत. अशा प्रकारे आपले खाते किंवा कागदपत्रांचा वापर सायबर फसवणुकीसाठी झाल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यासह श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण व नागोठणे पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि विशेष तपास पथकाने संयुक्तपणे तपासाची धुरा सांभाळली असून सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Raigad police crack down on mule accounts in cyber fraud cases uncover rs 35 crore scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित
1

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ
2

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ

Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! डेटा लीकच्या भीतीपोटी ‘या’ चुका करू नका; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा
3

Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! डेटा लीकच्या भीतीपोटी ‘या’ चुका करू नका; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

Paytm Payments Bank: Paytm ला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका! पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश; युजर्सचे काय होणार?
4

Paytm Payments Bank: Paytm ला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका! पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश; युजर्सचे काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.