Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla Parishad : रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालके आणि गरोदर मातांसाठीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 04:13 PM
रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप

रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • महिला व बालकल्याण विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
  • अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप
  • अपूर्ण कामाची कोट्यवधींची बिले मंजूर झाल्याचा दावा
भारत रांजणकर, अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून, बालके आणि गरोदर मातांसाठी असलेल्या विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराला विभागाच्या मुख्य अधिकारी (HOD) निर्मला कुचिक या जबाबदार असून त्यांच्यासह संबंधित दोषी कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक शासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सभापतींनी केली आहे. अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती रसिका केणी यांनी आपल्याच विभागातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले.

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

अंगणवाडी वीज जोडणीत २.५ कोटींचा अपहार?

अंगणवाड्यांमधील वीज जोडणी आणि सौर ऊर्जा (सोलर पॅनेल) प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत सभापती म्हणाल्या की, “रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल पुरवण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले होते. सोलर पॅनेल आले, मात्र त्यांची योग्य प्रकारे वीज जोडणीच करण्यात आली नाही. जोडणी न केल्यामुळे हे लाखो रुपयांचे साहित्य धूळ खात पडून राहिले आणि निकृष्ट दर्जाचे झाले. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नसतानाही कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले अदा करून अधिकारी मोकळे झाले आहेत. या केवळ एकाच प्रकल्पात सुमारे २.५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक संशय आहे.”

स्थानिक कंत्राटदारांना डावलून पुण्याच्या कंत्राटदारांना झुकते माप

महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य अधिकारी निर्मला कुचिक यांच्या कामकाजावर आक्षेप घेताना सभापतींनी आरोप केला की, रायगड जिल्ह्यात सक्षम कंत्राटदार उपलब्ध असतानाही येथील एकाही स्थानिक व्यक्तीला काम दिले जात नाही. प्रशासकीय कालावधीपासून ते आत्तापर्यंत कुचिक मॅडम यांच्याकडून केवळ पुण्यातील कंत्राटदारांचीच नावे सुचवली आणि रेटली जात आहेत. यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

१००% कागदोपत्री वाटप; प्रत्यक्षात मात्र २५% चाळण!

खाऊ वाटप, अंगणवाडीतील मुलांचे गणवेश आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण किट वाटपातही मोठा घोळ सुरू असल्याचे सभापतींनी उघड केले. कागदोपत्री या योजनांचे १००% वाटप दाखवून शासकीय निधी हडप केला जात आहे, तर प्रत्यक्षात जमिनीवर केवळ २५% लाभार्थींनाच याचा लाभ मिळतो आहे. उर्वरित ७५% साहित्याची बिले परस्पर लाटली जात आहेत.

बालकांच्या आरोग्याशी खेळ; निकृष्ट खाऊ कचऱ्याच्या कुंडीत!

“लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार (खाऊ) अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्याचे पॅकेजिंगही अतिशय घाणेरड्या आणि निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. हा खाऊ इतका खराब आहे की मुले तो खाऊ शकत नाहीत, परिणामी हा शासकीय पैशातून घेतलेला अन्नधान्याचा साठा थेट कचऱ्याच्या कुंडीत फेकला जात आहे,” असा संताप केणी यांनी व्यक्त केला. ई-टेंडरिंग होऊन ५-६ महिने उलटले तरी कामांची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) भूमिकेवर प्रश्नचिन्ह

प्रशासकीय जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (CEO) देखील असते. मग गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत आणि टेंडरिंग होऊनही कामे का रखडली, याची माहिती सीईओ मॅडमनी का घेतली नाही? लहान मुलांच्या आणि गरोदर मातांच्या या संवेदनशील प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने लक्ष का दिले नाही? असा थेट सवाल करत या प्रकरणाला सीईओ देखील कुठेतरी जबाबदार आहेत का, असा प्रश्न सभापती रसिका केणी यांनी उपस्थित केला आहे.

Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

शासनाला कारवाईची विनंती

“महिला व बालविकास हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. लहान मुलांच्या तोंडचा घास आणि गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून शासनाने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची किंवा कडक फौजदारी कारवाई करावी, ही माझी प्रशासनाला आणि सरकारला नम्र विनंती आहे.या गंभीर आरोपांमुळे रायगड जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोपी अधिकारी निर्मला कुचिक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,  अशी माहिती रसिका राजा केणी (सभापती, महिला व बालकल्याण विभाग, रा.जि.प.) यांनी दिली.

Web Title: Raigad zilla parishad women child welfare department corruption 2 5 crore solar project scam allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad News
  • Solar Panel
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
1

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
2

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
3

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
4

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.