Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : वासरे – पळसदरी भागाला जोडणारा पूल रेल्वे बनवणार; श्रीरंग बारणे यांचं आश्वासन

वासरे खोंड्याला कर्जत आणि पळसदरी येथून खोपोली रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा नेवाळी ते पळसदरी रेल्वे ओव्हर ब्रिज लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत श्रीरंग बारणे यांनी आश्वासन दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2025 | 05:08 PM
Karjat News : वासरे – पळसदरी भागाला जोडणारा पूल रेल्वे बनवणार; श्रीरंग बारणे  यांचं आश्वासन
Follow Us
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे स्थानक पळसदरी यांना जोडणारा पूल बांधण्याची मागणी रेल्वे करण्यात आली होती.या पुलाचे बांधणीचे कामाचे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले होते.त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी शिवसेना भाजप पदाधिकारी यांनी वासरे पळस दरी पुल बांधण्यासाठी जागेची पाहणी केली.

वासरे खोंड्याला कर्जत आणि पळसदरी येथून खोपोली रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा आवळस नेवाळी ते पळसदरी रेल्वे ओव्हर ब्रिज लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी गेल्या काही काळापासून विविध राजकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. काल मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे कर्जत रेल्वे स्थानकाच्या भेटीत शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी ही समस्या मांडली.त्यावेळी खासदार बारणे यांनी त्या पुलाचे कामाला तत्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्यानंतर आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना पदाधिकारी, गावकरी आणि रेल्वेचे अधिकारी एकत्र येत पळसदरी स्टेशन येथे प्रत्यक्ष पाहणी केली.खासदार बारणे यांनी या पुलासाठी आपण स्वतः रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यावर रेल्वे मंत्रालयाने कळवले की महाराष्ट्र शासन 50% व रेल्वे 50% खर्च करण्याच्या अटींवर प्रस्ताव सादर करावा असे पत्राद्वारे कळविले होते.या ब्रिजच्या उभारणीने वासरे खोंड्याच्या नागरिकांना आठ किलोमीटरचा फेरा वाचणार असून, खोपोली- लोणावळ्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

आज रेल्वेचे इंजिनियर कदम यांनी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी यांच्यासह जागेची पाहणी केली.त्यावेळी रेल्वे अभियंता कदम यांनी लवकरच याचे इस्टिमेट आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व जनतेच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.या पाहणी प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर,भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे, भाजपा कर्जत तालुका माजी सरचिटणीस वसंत महाडीक,तसेच ऍड सचिन दरेकर, शुभम शिंदे, सुरज दळवी पत्रकार अभिजीत दरेकर, रघुनाथ निगुडकर, प्रकाश सुर्वे, नरेंद्र दरेकर, सेनेचे उप तालुका प्रमुख अँड प्रदीप सुर्वे, महेंद्र निगुडकर,रमेश मोरे,दादू दरेकर , कल्पेश दरेकर आदी तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.वासरे-खोंड्याच्या जनतेसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे अशी भावना संतोष भोईर यांनी व्यक्त केली.

Web Title: Railways will build a bridge connecting vasare palasdari area shrirang barne assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News
  • Rain News

संबंधित बातम्या

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
1

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
2

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Karjat Electricity News : कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर
3

Karjat Electricity News : कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
4

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.