Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

तळा नगरपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. दि. ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह केवळ शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2026 | 03:20 PM
Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Follow Us
Follow Us:
  • तळा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली.
  • २ कोटी ९५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर असूनही ठराव देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.
  • विकासकामांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांमुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
तळा: तळा नगरपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शहराच्या विकासकामांवरून सुरू झालेला वाद आता थेट नगरपंचायतीच्या सभागृहापर्यंत पोहोचला असून, ‘कामे मंजूर आहेत, मग ठरावाला मुहूर्त कधी?’ असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी तळा नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह केवळ शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

दुसरीकडे मुख्याधिकारी मनिषा वजाळे, भाजपच्या नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा सुरू होण्याआधीच ‘खेळ खल्लास’ झाला आणि सभा तहकूब करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी रंगली. विकासकामांच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सत्तेचा ताळमेळ नेमका कुठे बिघडला आहे

दरम्यान, सर्वसाधारण सभेलाच सत्ताधारी गटातील नगरसेवक गैरहजर राहिल्याने तळा नगरपंचायतीतील सत्तेचा ताळमेळ नेमका कुठे बिघडला आहे? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. शहराच्या विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असताना, कामांना ठरावाची वाट दाखवायची की राजकीय कुरघोडीची यावर तळ्याच्या विकासाचा गाडा अडकणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, तळा नगरपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली सुरू झालेला राजकीय ‘सामना’ सध्या चांगलाच रंगला असून, मंजूर कामांना ठराव कधी मिळणार आणि सत्ताधारी आघाडीतील हा वाद कुठपर्यंत जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

ठरावाच्या फाईलला मात्र ‘लाल सिग्नल’

शिवसेनेच्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, शहरासाठी तब्बल २ कोटी ९५ लाख रुपयांची कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे मंजूर होऊनही त्यांना आवश्यक ठराव देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. म्हणजे एकीकडे विकासकामांना मंजुरीचा ‘हिरवा कंदील’, पण दुसरीकडे ठरावाच्या फाईलला मात्र ‘लाल सिग्नल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Tala nagar panchayat rift escalates development works approved but resolution stuck amid ncp shiv sena dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
1

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
2

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
3

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ
4

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.