Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी दाखल रुग्णाच्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 02:30 PM
रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

Follow Us
Follow Us:
  • रुग्णाच्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळलं.
  • निकृष्ट जेवणाबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा आरोप.
  • दोषी ठेकेदारावर कारवाईची मनसेकडून मागणी.
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला रात्री दिलेल्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निष्काळजी आहार पुरवठादार ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून संबंधित रुग्णालय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

Mira Bhayandar : गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले, ‘पालिकेला 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’

२८ ऑगस्ट रोजी रात्री कळवा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एक रुग्ण दाखल झाला होता. रात्रीच्या वेळी रुग्णालयाकडून रुग्णाला जेवणाचे ताट देण्यात आले. रुग्ण जेवण करत असतानाच ताटातील अन्नामध्ये झुरळ दिसून आले. हा प्रकार रुग्णाने तातडीने निदर्शनास आणून दिल्यानंतर संपूर्ण वॉर्डात संताप व्यक्त करण्यात आला, अशी माहिती मनसे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिली.

रुग्णांच्या तक्रारींकडे प्रशासनाचा कानाडोळा

कळवा रुग्णालयात ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि ग्रामीण भागातून दररोज हजारो गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. येथे दररोज हजारो रुग्णांना जेवण पुरवले जाते. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे नेहमीच कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे.

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी म्हटले की, “आजारी रुग्णांना स्वच्छ आणि सकस आहार मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. अन्नात झुरळ आढळणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ मांडण्यासारखे आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन हॉटेल्सवर कारवाई करत असताना, ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एवढा अक्षम्य प्रकार घडूनही एफडीए आणि प्रशासन डोळेझाक का करत आहे? या प्रकरणातील दोषी ठेकेदाराबा परवाना तत्काळ रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि जबाबदार रुग्णालय प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Kalwa hospital patient food cockroach found thane municipal hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Hospital
  • NAVARASHTRA
  • Thane news

संबंधित बातम्या

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
1

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला

अपघाताबद्दल आणि अर्थ खाते कुणाकडे द्यावे याबद्दल बोलू नये; अजित पवारांच्या अपघातावरून गिरीश महाजनांचा संताप
2

अपघाताबद्दल आणि अर्थ खाते कुणाकडे द्यावे याबद्दल बोलू नये; अजित पवारांच्या अपघातावरून गिरीश महाजनांचा संताप

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी
3

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल
4

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.