Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा

टोरंटो कंपनीने राजनाला कालव्यातून बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंधाऱ्यावर मोटार लावून पाणी वळवण्यात आल्याने स्थानिक पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2026 | 03:27 PM
टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा

टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा

Follow Us
Follow Us:
  • टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी
  • बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा
  • खासगी कंपनीला कोणत्या आधारे पाणी दिले गेले?
कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली पोटल भागात टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे.या प्रकल्पाला शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे,पण प्रकल्पाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. त्यात आता या प्रकल्पाच्या ड्रॉलिंगचे कामासाठी आणि येथे राहणारे कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असलेले पाणी राजनाला कालव्यातून उचलले जात आहे.दरम्यान, कालव्याचे पाणी शेतीसाठी असताना कालव्याच्या बंधाऱ्यातील पाणी मोटारीचे आधारे पंप लावून उचलले जात असून खासगी कंपनीला कोणत्या आधारे पाणी दिले गेले? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी

टोरंट कंपनी पाली तर्फे कोतवाल खल्लाटी मधील साई डोंगर तसेच ढाक डोंगर येथे दोन जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाहीत असे असताना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसखोरी करून माती आणि दगड यांची तपासणी करण्यासाठी ड्रिलिंग केले जात आहे. या कामासाठी लागणारे पाणी उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या पेज नदीमध्ये मिळू शकत नाही.त्यामुळे टोरंट कंपनीने मोठी शक्कल लढवली असून तेथील आदिवासी वाडीच्या बाजूने आंध्र धरणातील वीज निर्मिती झालेले पाणी शेतीसाठी कालव्यातून सोडले जाते.पाणी शेतीसाठी मिळावे म्हणून बंधारा बांधला असून त्या बंधाऱ्यातून पुढे पोटल गावाकडे असलेल्या कालव्यात पाणी सोडले जाते.मात्र त्या आधी पाणी साठवण बंधाऱ्यातून पाणी चोरण्याचे काम टोरंट कंपनीकडून केले जात आहे.

टोरंट कंपनीने त्या ठिकाणी शेतीसाठी असलेले पाणी साठवण बंधाऱ्यातून पंपाद्वारे उचलले आहे.त्यासाठी कर्जत येथील पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी कार्यालयातून परवानगी घेणे आवश्यक आहे.शेतीसाठी असणारे पाणी अन्य वापरासाठी उचलले जात असेल तर त्यास परवानगी देता येते काय? याबाबत शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.औद्योगिक कामासाठी राजनाला कालवा पाणी वापरता येते की नाही याबाबत पाटबंधारे विभागाने आम्हाला सांगावे अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली आहे.मात्र टोरंट कंपनीने त्या ठिकाणी असलेल्या पाणी साठवण बंधाऱ्यातून चक्क मोटार लावून पाणी उचलले आहे. बंधाऱ्यातून उचललेले पाणी किमान दोन किलोमीटर पर्यंत नेले आहे.त्याचवेळी तेथे असलेले कर्मचारी यांना राहणारे कर्मचारी यांच्यासाठी पाणी दिले आहे. तर माती आणि दगड परीक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असून ते सर्व पाणी कालव्यातून बेकायदा उचलले जात आहे.याबाबत पाटबंधारे विभागाकडे माहिती घेतली असता कर्जत पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अमित पारधे यांनी मंत्रालय स्तरावरून पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे.पाटबंधारे विभागाने स्थानिक पातळीवर पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी उचलले जात नाही आणि असे असताना पाटबंधारे खात्याची भूमिका संशयास्पद असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

३२०० मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या या जलविद्युत प्रकल्पासाठी वन विभागाने जमीन दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र खरोखर या प्रकल्पाला वन विभागाने जमीन दिली आहे काय? याची कोणतीही माहिती कर्जत पूर्व वन क्षेत्रपाल यांच्या कार्यालयाला नाही. वन विभागाने या प्रकल्पाला ६४० हेक्टर जमीन दिली असल्याची चर्चा आहे,त्यास स्थानिकांनी आक्षेप घेतला असून जंगलातून सुकलेली लाकडे तोडून आणणाऱ्या आदिवासी लोकांवर वन विभाग कारवाई करीत असते.जंगलातील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला काहीही मदत करीत नाही.परंतु वन जमिनीमध्ये घुसखोरी करून तेथे पालापाचोळा आग लावून जाळून टाकण्याचे काम टोरंट कंपनीकडून होत आहे.वन जमिनीचा प्रश्न गंभीर असताना आता आदिवासी लोकांची वहिवाट बड्या उद्योगपती यांच्या टोरंट प्रकल्पासाठी अडचणीत आली आहे.तेथे आदिवासीना वन हक्क कायद्याने जमीन मिळाली आहे,त्या जमिनीवर आता पुन्हा एकदा वन विभाग हक्क सांगत आहे.आदिवासी लोकांच्या जमिनीवर टोरंट कंपनीच्या कामगारांनी टेन्ट बांधले असून त्या तंबूमध्ये अनेक कर्मचारी राहून आहे.

Palghar News : डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे; उर्से गावाचा अभिमान उंचावला

Web Title: Toronto company water theft rajanala canal motor pumping news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • karjat news
  • technology

संबंधित बातम्या

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य
1

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य

व्ह्यूसोनिकतर्फे इनबिल्ट ५० मेगापिक्सेल एआय कॅमेरा असलेला पहिला ‘व्ह्यूबोर्ड’ लाँच! पाहून घ्या हायटेक फीचर्स
2

व्ह्यूसोनिकतर्फे इनबिल्ट ५० मेगापिक्सेल एआय कॅमेरा असलेला पहिला ‘व्ह्यूबोर्ड’ लाँच! पाहून घ्या हायटेक फीचर्स

अ‍ॅस्टन मार्टिनने आणली शक्तिशाली मिलिटरी कार; ‘Call of Duty’ गेममध्ये दिसणार ‘या’ SUV चा थरार!
3

अ‍ॅस्टन मार्टिनने आणली शक्तिशाली मिलिटरी कार; ‘Call of Duty’ गेममध्ये दिसणार ‘या’ SUV चा थरार!

नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त 
4

नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.