आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा फटका घरगुती गॅस सिलेंडर वितरणालाही बसला आहे.
Raigad News: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा फटका घरगुती गॅस सिलेंडर वितरणालाही बसला आहे. उरण तालुक्यात मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडर वितरणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि वितरण कंपन्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दै. नवराष्ट्रने घेतलेल्या आढाव्यानुसार, उरणमध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण शासकीय नियमांनुसार सुरू आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवत ग्राहकांना प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करून दिले जात असल्याचे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
याचा असा परिणाम झाला की, आखाती देशांमधील युद्धपरिस्थिती आणि भारतावर परिणाम झाला. व्यावसायिक सिलिंडरचे वितरण तात्पुरते बंद करण्यात आले. मात्र, उपलब्ध माहितीनुसार सध्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर याचा परिणाम जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत गॅस वितरणात अनियमितता असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
काही ठिकाणी सिलेंडर उशिरा मिळणे, तर काही ठिकाणी वितरणात विलंब होणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. वितरण कंपन्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, आवश्यक तेवढाच गॅस वापर करण्याचेही सांगितले आहे. तसेच गॅस सिलेंडर बुकिंग आणि वितरण प्रक्रियेत संयम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत पुरवठा अधिक स्थिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.






