Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

मुरुडमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 01:42 PM
Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

Follow Us
Follow Us:
  • मुरुड तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई गंभीर बनली असून कोर्लई गावातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
  • आंबोली धरणात पाणी उपलब्ध असूनही वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरात केवळ १ तासच पाणीपुरवठा केला जात आहे.
  • नगरपरिषदेच्या थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट फटका पाणीपुरवठ्यावर बसत आहे.
मुरुड जंजिरा: कडक उन्हाळा सुरू झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. उष्णता वाढल्याने पाण्याची पातळी खूप खालावली आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यासह शहरी भागात सुद्धा तीव्र पाणी टंचाईमुळे पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे लागत आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. फणसाड धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने येथे पाण्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांना स्वतंत्रपणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेली अनेक दिवस लोक पाणी टंचाईस तोंड देत आहेत. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहेत. ग्रामसभेत सुद्धा लोकांनी आवाज उठवला आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आता ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. सुमारे १२ हजारच्या आसपास असणाऱ्या लोकसंख्या मुबलक पाणी मिळत नसल्याने येथील लोक सुद्धा त्रस्त झाले आहेत. मुरुड शहराला आंबोली धरणातून पाणी पुरवठा होत असतो. सध्या तरी आंबोली धरणात मुबलक पाणी आहे. परंतु या भागात असणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मुरुड नगरपरिषदेस पाणी पुरवठा करणे जिक्रीचे बनले आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या भागात विजेचे सातत्य टिकून राहणे खुप आवश्यक आहे.

१२ हजार लोकसंख्येच्या तुलनेने पाणीपुरवठा कमी

वीज व्यवस्थित व टिकून राहिली तर मोठ्या पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते. परंतु वीज गेली तर छोट्या पंपद्वारे पाणी पुरवठा कमी प्रमाणात होऊन याची झळ नळ ग्राहक यांना सहन करावी लागत आहे. सध्या मुरुड शहरात एक तास पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे १२ हजार लोकसंख्येस हा पाणी पुरवठा खूपच अल्प असा आहे. मुरुड शहर हे पर्यटन स्थळ असून येथे असंख्य हॉटेल व लॉजेस आहेत.

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

आंबोली धरणात अबाधितपणे वीज पुरवठा गरजेचा

शनिवार व रविवार येथे पर्यटक संख्या खूप मोठी असते. अशा वाढत्या लोकसंख्येस फक्त १ तास पाणी पुरवठा होत असल्यामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मुरुड शहरातील काही भागात तर अर्धा तास पाणी दिले जात आहे. मुरुड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आंबोली धरणात अबाधितपणे वीज पुरवठा होत राहिला तर मुरुड शहरात चांगला पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. याबाबत दै. ‘नवराष्ट्र’च्या प्रतिनिधीने मुरुड महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, प्रतिक्रिया देताना सूर्यवंशी यांनी सांगितले की, “मुरुड नगरपरिषदेने रस्त्यावरील पथदिवे व आंबोली धरणाला पाणी पुरवठा करणारी विद्युत यंत्रणेचे लाखो रुपये थकीत ठेवले आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून आमच्यावर सतत दबाव येत असून पैसे भरणे खूप आवश्यक आहे. त्यांनी लवकरात लवकर पैसे भरले तर विजेमध्ये सातत्य ठेवण्याची जबाबदारी आमची असेल, नगरपरिषदेने थकीत रक्कमेचा भरणा लवकरात लवकर करावा वीज पुरवठा नियमित होईल”, असे त्यांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Water crisis in murud only one hour water supply in villages raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Murud
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
1

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
2

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
3

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
4

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.