Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविमाकडे पाठ! 3 लाख हेक्टर लागवडीपैकी फक्त 4,850 हेक्टरच विमाधारक

चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेला यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत जवळ आली असतानाही लाखो हेक्टर लागवडीपैकी अत्यल्प क्षेत्राचाच विमा उतरवण्यात आल्याने कृषी विभागाची चिंता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 02:19 PM
Chandrapur News: चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविमाकडे पाठ! 3 लाख हेक्टर लागवडीपैकी फक्त 4,850 हेक्टरच विमाधारक

Chandrapur News: चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविमाकडे पाठ! 3 लाख हेक्टर लागवडीपैकी फक्त 4,850 हेक्टरच विमाधारक

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरमध्ये 3.11 लाख हेक्टर लागवडीपैकी आतापर्यंत केवळ 4,850 हेक्टर क्षेत्राचाच पीकविमा उतरवण्यात आला आहे.
  • पावसाचा खंड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि ई-पीक पाहणीची अनिवार्यता यामुळे पीकविमा नोंदणीचा वेग मंदावला आहे.
  • कृषी विभागाने शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाची प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली जाते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असताना चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेकडे अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ११ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, कापूस, धान व सोयाबीनची लागवड झाली असली तरी त्यापैकी केवळ ४ हजार ८५० हेक्टर क्षेत्राचाच पीकविमा उतरविण्यात आला आहे. म्हणजे एकूण लागवड क्षेत्राच्या अत्यल्प भागालाच विमा संरक्षण मिळाले आहे.

माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप पिकांसाठी विमा रकमेच्या केवळ २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि नगदी तसेच फळपिकांसाठी ५ टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट, कीड-रोग तसेच काढणीनंतरचे नुकसानही या योजनेत समाविष्ट आहे. इतक्या व्यापक संरक्षणाची तरतूद असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्याप विमा योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने अनेक ठिकाणी पेरणी उशिराने झाली असून काही भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विमा संरक्षण घेणे गरजेचे असतानाही प्रतिसाद कमी असल्याने कृषी विभागाची चिंता वाढली आहे.

गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ८४ हजार ४६७ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आला होता. यंदाच्या तुलनेत हा आकडा अनेक पटींनी जास्त होता. त्यामुळे यंदा पीकविमा नोंदणीचा वेग अत्यंत मंद असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर्षी पीकविमा नोंदणीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक तसेच ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नव्या प्रक्रियेबाबत अनेक शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण माहिती नसल्यानेही नोंदणीचा वेग मंदावल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पीकविमा नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. विशेष बाब म्हणजे यंदापासून हळद पिकाला फळपिकाचा दर्जा देण्यात आला असून जिल्ह्यातील १४६ शेतकऱ्यांनी ८३.३२ हेक्टर क्षेत्रावरील हळदीचा विमा उत्तरविला आहे.

पावसाची प्रतीक्षा कायम

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. अनेक गावांमध्ये उशिराने पेरणी झाली असून काही भागात पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही कारण ते अजूनही पावसाच्या पुढील सरींची वाट पाहत आहेत. काही शेतकरी पाऊस समाधानकारक झाल्यानंतरच पुढील गुंतवणूक करण्याच्या भूमिकेत आहेत. परिणामी जिल्ह्यात पीकविमा नोंदणीचा वेग अत्यंत मंदावला आहे.

Cultural News: ग्रामीण साहित्याला शहरातील वाचकांचा वाढता प्रतिसाद; पुण्यात नव्या वाचकवर्गाची निर्मिती

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. ॲग्रीस्टँक नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी पूर्ण केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीकविमा भरून घ्यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे.- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur farmers show low response to pm crop insurance scheme deadline on july 31

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Diesel Blending: महत्त्वाची बातमी! डिझेलमध्येही बायोडिझेलचं मिश्रण; पेट्रोल पंपांवर विक्रीला सुरुवात, किती टक्के आहे प्रमाण?
1

Diesel Blending: महत्त्वाची बातमी! डिझेलमध्येही बायोडिझेलचं मिश्रण; पेट्रोल पंपांवर विक्रीला सुरुवात, किती टक्के आहे प्रमाण?

Shark Tank India 6: शार्क टँक इंडियाचा नवा धमाका; ‘#DontBeATota’ मोहिमेद्वारे स्टार्टअप बझवर्ड्स वापरणाऱ्यांना मोलाचा सल्ला!
2

Shark Tank India 6: शार्क टँक इंडियाचा नवा धमाका; ‘#DontBeATota’ मोहिमेद्वारे स्टार्टअप बझवर्ड्स वापरणाऱ्यांना मोलाचा सल्ला!

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! E20 फ्यूलच्या वादात सरकारने उचलले मोठे पाऊल; नेमका काय आहे मास्टर प्लॅन?
3

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! E20 फ्यूलच्या वादात सरकारने उचलले मोठे पाऊल; नेमका काय आहे मास्टर प्लॅन?

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?
4

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.