Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Good News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सावंतवाडी रोड स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा देण्यात येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 02:24 PM
बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यंदाही रेल्वे स्थानकांवर तिकिटांसाठी मोठी गर्दी
  • कोकणवासीयांची गावाकडे जाण्याची लगबग
  • प्रवाशांसाठीही काही विशेष सेवा सुरू
Ganeshotsav Special Trains 2026: गणेशोत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे, पुणे आणि परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची गावाकडे जाण्याची लगबग सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे स्थानकांवर तिकिटांसाठी मोठी गर्दी होत असून, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याबरोबरच सावंतवाडी रोड स्थानकावर काही प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष गाड्यांची सोय

फक्त लांब पल्ल्याच्याच नव्हे तर उपनगरी भागातील प्रवाशांसाठीही काही विशेष सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. दिवा ते खेड आणि दिवा ते चिपळूण या मार्गांवर अतिरिक्त मेमू गाड्या चालवल्या जाणार आहेत. या सेवेमुळे कोकणातील मधल्या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.(Good News!)

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

पुणेकरांसाठीही यंदा आनंदाची बातमी आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली असून गणेशोत्सवाच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या दिशेनेही अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

रेल्वे तिकिटांची मागणी प्रचंड

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी आपल्या गावी परततात. त्यामुळे रेल्वे तिकिटांची मागणी प्रचंड वाढते. यंदा प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळेआधीच नियोजन केले आहे. अतिरिक्त गाड्या आणि नवीन थांबे यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

रेल्वेकडून चाकरमान्यांसाठी विशेष आवाहान

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळ किंवा रेल्वे आरक्षण केंद्रातून तिकिटे वेळेत बुक करण्याचे आवाहन केले आहे. विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि उपलब्ध जागांची माहिती नियमितपणे तपासण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेवर व्हावा, यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे.

सावंतवाडी रोड स्थानकावर नवीन थांबा मिळालेल्या गाड्या

गाडी क्रमांक गाडीचे नाव सावंतवाडी आगमन सावंतवाडी प्रस्थान लागू तारीख5
12133 सीएसएमटी – मंगळुरू एक्स्प्रेस 07:02 सकाळी  07:04 सकाळी सुरू
12134 मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस 11:30 रात्री  11:32 रात्री 27 जुलै
12432 हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस 06:18 सकाळी  06:20 सकाळी 26 जुलै
12431 तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस 09:44 सकाळी  09:46 सकाळी 28 जुलै
12201 एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्स्प्रेस 02:02 पहाटे  02:04 पहाटे 27 जुलै
12202 तिरुवनंतपुरम – एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस 03:28 पहाटे  03:30 पहाटे 30 जुलै

गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या

 गाडी क्रमांक मार्ग कालावधी फेऱ्या सुटण्याची वेळ
01031 / 01032 सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी 1 ते 27 सप्टेंबर 16 दुपारी 3:30
01071 / 01072 एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी 1 ते 28 सप्टेंबर 17 सकाळी 8:20
 01155 / 01156 दिवा – खेड – दिवा (मेमू) 1 ते 27 सप्टेंबर 16 सकाळी 7:15 (दिवा)
09445 / 09446 पुणे – रत्नागिरी – पुणे 12 ते 26 सप्टेंबर साप्ताहिक  रात्री 12:25 (पुणे)
01133 / 01134 दिवा – चिपळूण – दिवा 1 ते 28 सप्टेंबर 15 दुपारी 1:40 (दिवा)

 

 

Web Title: Railways announces special trains and extra halt at sawantwadi road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Ganpati Festival
  • Indian Railway
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
1

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
2

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या
3

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.