Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर
पशु संवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात एकूण ६ लाख ७१ हजार लसमात्रांचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये (घटसर्प) एचएस १,४०,०००, बीक्यू (एकटांग्या) १,५०,००० आणि ईटीव्ही (आंत्रविषार) २ लाख ७० हजार लसींचा समावेश होता. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन पशुपालकांच्या दारात लसीकरण पूर्ण केले. त्यामुळे पावसाळ्यात पशुधनाला होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असेही डॉ कुंभरे म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात २,५५,७४७ गाई, ५०,१८१ म्हशी, २,७७,५७३ शेळ्या आणि ७४, १४३ मेंढ्या आहेत. या पशुधनाच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत बीक्यू आणि एचएस लसीकरणात प्रत्येकी ९८ टक्के, तर ईटीव्ही लसीकरणात ९७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले, जिवती, पोंभूर्णा आणि वरोरा तालुक्यांनी काही लसीकरण प्रकारांत १०० टक्के कामगिरी नोंदविली असून नागभीड तालुक्यात ईटीव्ही लसीकरण ९९.७८ टक्के झाले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवणे, चिखल व साचलेले पाणी टाळणे, स्वच्छ पिण्याचे पाणी व संतुलित हिरवा कोरडा चारा उपलब्ध करून देणे, नियमित जंतनाशक औषधोपचार करणे आणि ताप, तोंडातून लाळ गळणे, पाय सुजणे किंवा भूक मंदावणे यांसारखी लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे विभागाने सांगितले आहे. वेळेवर लसीकरणासह योग्य व्यवस्थापन केल्यास पशुधनाचे आजार व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. त्यामुळे जनावरांचे लसीकरण त्वरित करा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.






