Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहोळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवारांची तुतारी वाजली

मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी ३०,२०२ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2024 | 11:48 AM
मोहोळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवारांची तुतारी वाजली

मोहोळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवारांची तुतारी वाजली

Follow Us
Follow Us:

मोहोळ : सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी ३०,२०२ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीतील अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना ९५,६३६ इतकी मते मिळाली.

मोहोळ विधानसभेच्या या निवडूकीत खूपच नाट्यमय घडामोडी घडल्या. अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यानी मतदानाच्या दोन दिवस आधी महाविकास आघाडीचे राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याविरुद्ध झालेल्या लढतीत राजू खरे यांचा पहिल्याच निवडणुकीत ३० हजारांच्या फरकाने विजय सुखकर झाला.

यंदा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने पुन्हा एकदा मैदानात उतरले होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाने आमदार रमेश कदम यांच्या मुलीला प्रथम उमेदवारी दिली होती. पण अचानक ती उमेदवारी बदलून राजू खरे यांना दिली, एकंदरीत पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात काटे की टक्कर असे नवीन चित्र पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा : जानकर जिंकले, परंतु सातपुतेंनी घाम फोडला; माळशिरस विधानसभा मतदारसंघात झाली चुरशीची लढत

यामध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे राजू खरे यांना १ लाख २५ हजार ८३८ इतकी मते मिळाली तर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांना ९५ हजार ६३६ इतकी मते मिळाली. यामध्ये राजू खरे हे ३० हजार २०२ मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.

मोहोळचा माझा विजय हा ऐतिहासिक विजय असून, मी या विजयाचे सर्व श्रेय येथील बारा बलुतेदारांना आणि मायबाप जनतेला सुपूर्द करतो. माझ्या या विजयामुळे या तालुक्यातील दादागिरी, हुकुमशाही, झुंडशाही, तानाशाही आता संपुष्टात आली आहे. मी आजपासून मोहोळच्या या जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहीन. – राजू खरे, नूतन आमदार, मोहोळ विधानसभा

Web Title: Raju khare has won from mohol assembly constituency nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
2

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
3

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
4

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.