Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली, व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा; राजू शेट्टींची मागणी

थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2025 | 01:08 PM
साखर कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली, व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा; राजू शेट्टींची मागणी

साखर कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली, व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा; राजू शेट्टींची मागणी

Follow Us
Follow Us:
  • कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली
  • व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा
  • राजू शेट्टींची मागणी
कोल्हापूर : राज्यातील १६३ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास ४० दिवसानंतरही एफआरपी दिलेली नाही. थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. संबधित साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शेट्टी यांनी म्हटले आहे की, १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसाचे जवळपास २ हजार कोटी रूपयाचे उसबिले थकवली आहेत. राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. राज्यामध्ये चालू वर्षीच्या गळीत हंगामात १६३ साखर कारखान्यांनी १५ नोव्हेंबर अखेर जवळपास १ कोटी १० लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. यापैकी ३४ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली असून, १२९ साखर कारखान्यांकडे जवळपास २००५ कोटींची एफआरपी थकित आहे.

शेट्टींनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एक रक्कमी एफआरपी विरोधात आव्हान याचिका दाखल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन टप्यात एफआरपी अदा करण्याची मागणी केली आहे. याचिकेची सुनावणी सुरू असून, येत्या १७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी आहे. ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकार, साखर संघ व राज्यातील साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी ठेवली आहे.

राज्य सरकारकडून पाठराखण

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून साखर कारखान्यांना पाठीशी घातल्याने राज्यातील साखर कारखाने एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मराठवाडा व विदर्भासह सोलापूर व पुणे जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी सर्वाधिक थकित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वाभिमानीच्या रेट्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे.

Web Title: Raju shetty has demanded that sugar factories pay farmers money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Farmers
  • Raju Shetti
  • Sugarcane

संबंधित बातम्या

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
1

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.