Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 11:53 AM
कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय

कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले
  • आंबा बागायतदार अन् व्यापारी यांची संयुक्त बैठक
  • नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय
देवगड : कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर असलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजाने दिलेले ॲडव्हान्सेस, बाजार समितीमधील सौदे, वाहतूक व्यवस्था व सुविधा यासह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

 

आंबा बागायतदार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी पिकावर ॲडव्हान्सेस दिलेले आहेत. सदर ॲडव्हॅान्स दिलेल्या रक्कमेवर १८ ते २४ टक्के व्याज आकारणी केली जात आहे. यावर्षी ९० टक्के आंबा उत्पादन घटल्याने व आंबा बागायतदार यांनी मोठ्या प्रमाणात बागेवर खते, किटकनाशके, मजूरी खर्च झाल्याने घेतलेल्या ॲडव्हान्सेसची व्याजासह परतावा करणे अशक्य झाले आहे. यावर्षी कोकणातील आंबा उत्पादन ९० टक्के घटले असताना कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व गुजरातमधून येणारा आंबा हा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जावू लागला आहे. कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटूनही दर पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. कोकणचा हापूस म्हणून परराज्यातून आलेला आंबा संपुर्ण राज्यभर विकला गेल्याने आंब्याचे दर पडू लागले आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरदकुमार झरे, स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांतील बागायतदार, एपीएमसी मार्केटमधील प्रमुख व्यापारी आणि बाजार समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

ॲडव्हान्स रक्कम वसूलीस सहकार्य करण्याचा निर्णय

यावेळी व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित व्याजाची रक्कम न मागता ॲडव्हान्स रक्कम वसूलीस सहकार्य करण्याचे ठरविले. याबरोबरच कोकणातून येणारा आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पध्दतीने जिल्हानिहाय वर्गवारी करण्याचे ठरले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय किती आंबा बाजार समितीत दाखल झाला याची माहिती दैनंदिन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी अथवा देवगड हापूस म्हणून बोगस आंब्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बागायतदार व व्यापाऱ्यांनीही केली.

हे सुद्धा वाचा : तळेगावात पाणीप्रश्नावर मोठा दिलासा; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

Web Title: Raju shetty has taken a big decision for debt ridden mango growers in a meeting in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Mango Rate
  • raju shetty
  • raw mango

संबंधित बातम्या

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी
1

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.