Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Sugarcane Rate : 3500 रुपयांच्या ऊसदरावरून कोंडी कायम! कारखानदारांची बैठकीला दांडी, आता राजू शेट्टी मैदानात

Dharashiv Sugarcane Rate : धाराशिवमध्ये 3500 रुपये प्रतिटन ऊसदराच्या मागणीवरून तिढा कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची दुसरी बैठकही निष्फळ ठरली. आता राजू शेट्टी आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 06:21 PM
Dharashiv Sugarcane Rate : 3500 रुपयांच्या ऊसदरावरून कोंडी कायम! कारखानदारांची बैठकीला दांडी, आता राजू शेट्टी मैदानात

Dharashiv Sugarcane Rate : 3500 रुपयांच्या ऊसदरावरून कोंडी कायम! कारखानदारांची बैठकीला दांडी, आता राजू शेट्टी मैदानात

Follow Us
Follow Us:
  • कारखानदारांची भूमिका गुलदस्त्यात
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारखानदारांची दांडी
  • राजू शेट्टी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार
 

Dharashiv Sugarcane Rate : उसाला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांच्या घामाला रास्त दाम मिळावा आणि ऊस उत्पादकांची आर्थिक पिळवणूक थांबावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला अद्याप यश आलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेली दुसरी बैठकही निष्फळ ठरल्याने ऊसदराचा तिढा अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
तब्बल 3 हजार 500 रुपये प्रतिटन दराची मागणी करूनही कारखानदार दर देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करूनही जिल्ह्यातील कारखानदारांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांनाही हरताळ फासला गेल्याची भावना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

बुधवारी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. ऊसदराच्या प्रश्नावर समन्वयातून तोडगा काढावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा व्हावी आणि आंदोलनाची कोंडी फुटावी, हा या बैठकीमागील उद्देश होता. मात्र, कारखानदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेची प्रक्रियाच पुढे सरकू शकली नाही. परिणामी, दुसरी बैठकही निष्फळ ठरली.

आश्वासनावर आंदोलन स्थगित; मात्र तोडगा निघालाच नाही!

उसाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येडशी येथील टोलनाक्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

प्रशासनाच्या या आश्वासनानंतर संघटनेने चक्काजाम आंदोलन स्थगित केले होते. बैठकीतून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईल आणि ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत कारखानदारच अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय

कारखानदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला प्रतिटन 3 हजार 500 रुपये दर देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, कारखानदार हा दर देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारखानदार बैठकीला उपस्थित न राहिल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ऊसदरावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीलाच कारखानदारांनी अनुपस्थित राहणे, ही बाब गंभीर मानली जात आहे. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

आता राजू शेट्टी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक!

दुसरी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता पुढील चार ते पाच दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या बैठकीत तरी कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये दराबाबत एकमत होणार का, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तोडगा नाही तर आंदोलनाचा भडका?

एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उत्पादन खर्च, मजुरी आणि इतर खर्चाच्या ओझ्याखाली दबला जात असताना दुसरीकडे ऊसदराचा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे. आंदोलन स्थगित करण्यासाठी दिलेल्या आश्वासनानंतरही बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. कारखानदार बैठकीला अनुपस्थित राहून प्रशासनाच्या प्रयत्नांनाही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

आता पुढील बैठकीतही ऊसदराचा तोडगा निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे येडशी टोलनाक्यावरील चक्काजाम आंदोलनानंतर आता जिल्ह्यात ऊसदराचा संघर्ष कोणते वळण घेणार, याची उत्सुकता आणि धाकधूक शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या साखर कारखानदारीत शेतकऱ्यालाच त्याच्या उसाचा रास्त भाव मिळणार नसेल, तर न्याय मागण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय काय, असा संतप्त सवाल आता ऊस उत्पादकांमधून उपस्थित होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसदरासाठी काय मागणी आहे?

    Ans: उसाला प्रतिटन 3 हजार 500 रुपये दर मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

  • Que: धाराशिवमध्ये ऊसदराची दुसरी बैठक का निष्फळ ठरली?

    Ans: जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्ह्यातील साखर कारखानदार अनुपस्थित राहिल्याने चर्चा होऊ शकली नाही.

  • Que: ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुठे आंदोलन केले होते?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोलनाक्यावर संघटनेने बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले होते.

Web Title: Dharashiv sugarcane rate 3500 meeting fails raju shetty rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • raju shetty
  • sugar cane
  • Swabhimani Shetkari Saghtana

संबंधित बातम्या

Yedshi Toll Plaza Protest : शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचा एल्गार! येडशी टोलनाक्यावर ६ तास चक्काजाम; १८ नोव्हेंबरला तोडग्याची आशा
1

Yedshi Toll Plaza Protest : शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचा एल्गार! येडशी टोलनाक्यावर ६ तास चक्काजाम; १८ नोव्हेंबरला तोडग्याची आशा

Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?; रिफ्लेक्टरविना ट्रॉल्या बनताहेत मृत्यूचे सापळे
2

Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?; रिफ्लेक्टरविना ट्रॉल्या बनताहेत मृत्यूचे सापळे

Ahilyanagar News : ऊसदराचा प्रश्न पेटला; २३ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
3

Ahilyanagar News : ऊसदराचा प्रश्न पेटला; २३ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.