Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामपुरात अवतरले  ‘रामराज्य’! सकल हिंदू समाजातर्फे महाआरती;  जय ‘श्रीराम’चा अखंड जयघोष

देखण्या स्वागत कमानी, फुलांचा दरवळ प्रसादाचा घमघमाट, भगवे फेटे, टोप्या घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे, मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष, नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन‌् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवीसंगम अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात इस्लामपूर शहरात अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातर्फे श्रीरामाची महाआरती झाली.

  • By Aparna
Updated On: Jan 22, 2024 | 05:48 PM
इस्लामपुरात अवतरले  ‘रामराज्य’! सकल हिंदू समाजातर्फे महाआरती;  जय ‘श्रीराम’चा अखंड जयघोष
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : देखण्या स्वागत कमानी, फुलांचा दरवळ प्रसादाचा घमघमाट, भगवे फेटे, टोप्या घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे, मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष, नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन‌् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवीसंगम अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात इस्लामपूर शहरात अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातर्फे श्रीरामाची महाआरती झाली. शहरातील ४२ समाजातील २५० उभयतांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्यामुळे इस्लामपुरात अवघे रामराज्य अवतरल्याचे दिसून आले.

अयोध्येत रामजन्मभूमी येथे मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या पाचशे वर्षापासून चाललेल्या हिंदू जनतेच्या संघर्षाचा विजय झाला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिवशी दिवाळी साजरी करा व दिवे लाऊन महाआरती करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजातर्फे येथील यल्लमा चौकात दुपारी साडेबारा वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील ४२ समाजातील प्रत्येकी पाच आशा २५० उभयंत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी आ.भगवानराव सांळुखे,माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, एल.एन.शहा, वैभव पवार,भास्कर कदम, सुभाष शिंगण, मंगल शिंगण, सतीश महाडिक, अमित ओसवाल, संजय भागवत, राजेश मंत्री, भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत, उपाध्यक्ष भास्कर मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे,भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आशाताई पवार, प्रकाश शिक्षण मंडलाचे अध्यक्ष संजय जाधव, अजित पाटील, अक्षय पाटील, भाऊ पाटील, प्रवीण परीट, प्रमोद मोरे, अर्जुन पाटील, धनाजी पाटील, विकास परीट, विश्वजीत पाटील आदींसह शहरातील महिला वर्ग, सर्व धर्मातील रामभक्त, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी
प्रारंभी अनिल इनामदार यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली. तानाजी घोरपडे व त्यांच्या सुविद्य पत्नी विमल घोरपडे या उभयंत्याना पूजेचा मान मिळाला. महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी जय श्रीरामचा जयघोषाने संपूर्ण इस्लामपूर शहर राममय व भक्तिमय बनले होते.

पताका आणि झेंड्यांनी शहर भगवे
श्रीराम नवमीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आयोजकांनी तयारी सुरु केली होती. सोमवारी शहरातील सर्वच रस्त्यांवर भगव्या पताका आणि झेंडे लावण्यात आले होते. तसेच घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. सकाळपासून रामभक्त दुचाकीवर भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करीत होते.

हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
महाआरती  झाल्यानंतर यल्लमा चौकात सकल हिंदू समाजातर्फे रामभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो रामभक्तांनी याठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Ram rajya landed in islampur mahaarti by the sakal hindu samaj nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Islampur
  • maharashtra
  • maharashtra news
  • sangli news

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
1

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!
2

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
3

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
4

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.