अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘सीमोल्लंघन’ ! राम शिंदेंची यशवंतराव गडाखांशी भेट
“ज्याची चूक आहे त्याला चूक म्हणा!” – राम शिंदेंचा थेट इशारा- भेटीनंतर राम शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना आरपारची भाषा वापरली. विजयादशमीच्या शुभेच्छा देत ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही केवळ राजकारणाचा आखाडा नाही; ती शेतकरी, कारखानदार आणि लाखो सभासदांची बँक आहे! ही बँक बिनविरोध काढायची असेल तर यशवंतराव गडाखांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केलीच पाहिजे. ज्यांची चूक आहे त्यांना ‘चूक’ आणि ज्यांचं बरोबर आहे त्यांना ‘बरोबर’ म्हणण्याची धमक दाखवून वडीलकीच्या नात्याने सगळ्यांना सामोपचाराचा संदेश दिला पाहिजे!
पालकमंत्र्यांच्या बैठकीपूर्वीच शिंदेंची ‘फिल्डिंग’! आजच होणार खरा फैसला!’ विशेष म्हणजे, या राजकीय समीकरणांना वेग आला असतानाच, पालकमंत्री महोदयांनी आज दुपारी ३ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या या बैठकीआधीच राम शिंदे यांनी सोनईत जाऊन गडाखांची भेट घेतल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर स्पष्टीकरण देताना राम शिंदे म्हणाले, “पालकमंत्र्यांशी बोलून मी इथे आलेलो नाही. पण दुपारी ३ वाजता बिनविरोधच्या संदर्भात बैठक बोलावल्याचं मला समजलं. पालकमंत्र्यांचा मलाही फोन आला असून मी त्या बैठकीला नक्की जाणार आहे. पण त्याआधीच बिनविरोधचा मार्ग सुकर व्हावा म्हणून मी गडाख साहेबांची भेट घेतली.”
“उद्या ३ वाजेपर्यंत ‘सीमाउल्लंघन’ स्पष्ट होईल!”
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राम शिंदे यांनी अत्यंत सूचक आणि आक्रमक विधान केले. “आज विजयादशमीचं सीमाउल्लंघन ठरवलं जाईल आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व राहते आणि बँक खरोखर बिनविरोध होते की रणसंग्राम पेटतो, हे स्पष्ट होईल!” असा थेट इशाराच शिंदेंनी दिला आहे.
आता पालकमंत्र्यांच्या दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत कोणकोणते अर्ज मागे घेतले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!
FAQ
नक्की काय घडले? राम शिंदे-गडाख भेट का चर्चेत?
– अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ADCC) निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती राम शिंदे (भाजप) यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख (नेवासा गड) यांची भेट घेतली.
जिल्हा बँक निवडणूक काय आहे?
– अहिल्यानगर (अहमदनगर) DCC – शेतकऱ्यांची सर्वात मोठी बँक. यामध्ये अनेक शेतकरी सभासद आहेत.
राम शिंदे यांची भूमिका काय?
– राम शिंदे हे सध्या महाराष्ट्र विधानपरिषद सभापती आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघ – रोहित पवार विरुद्ध पारंपारिक लढाई असल्याचे पाहिला मिळत आहे.






