वीरेंद्र सेहवाग (फोटो- सोशल मिडिया)
वनडे सामने असतो वा कसोटी क्रिकेट, सर्वत्र आक्रमक संयमी खेळी करणे हे सेहवागचे वैशिष्ट्ये होते. सेहवागच्या नावावर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्याच्या आसपासही जगातील दुसरा कोणताही फलंदाज पोहोचलेला नाही. वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये १०० पेक्षा कमी चेंडूंमध्ये तब्बल ७ वेळा शतके झळकावण्याचा अनोखा जागतिक रेकॉर्ड केला आहे.
सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्लाबोल करणे आणि त्यांना सेट न होऊ देणे अशी रणनीती सेहवाग वापरत असल्याचे दिसून यायचे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच चौफेर हल्लाबोल करत सर्वात कमी चेंडूत शतके झळकावण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवाग जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इतर खेळाडूंनीही कसोटी सामन्यांमध्ये वेगवान शतके ठोकली आहेत. ब्रेंडन मैकुलम, डेव्हिड वार्नर आणि ख्रिस गेल यांनी आपल्या कारकिर्दीत 4 वेळेस 100 पेक्षा कमी बॉलमध्ये शतके पूर्ण केली आहेत. भारताचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव, पाकिस्तानचा शाहिद अफरीदी आणि वेस्ट इंडीजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांनी 3 वेळा हा रेकॉर्ड केला आहे.
वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 7 वेळेस 100 पेक्षा कमी बॉलमध्ये शतके पूर्ण केली आहेत. 2006 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 78 बॉलमध्ये केलेले हे सेहवागचे हे वेगवान शतक होते. त्यानंतर 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 87 बॉलमध्ये, 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 90 बॉलमध्ये, 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 90 बॉलमध्ये तर 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 97 बॉलमध्ये त्याने आपले शतक कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले होते. माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती किंवा समोरचा कोणताही गोलंदाज असो, त्यांची खेळण्याची आक्रमक शैली कधीही बदलली नाही. आक्रमक शैलीत त्याने कायमच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.






