Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : दापोली बाजारपेठेत भीषण आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 03:33 PM
Ratnagiri News : दापोली बाजारपेठेत भीषण आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
Follow Us
Follow Us:
  • दापोली बाजारपेठेत भीषण आग;
  • नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
दापोली/निसार शेख : शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एका दुकानातून धूर निघताना दिसला. हे लक्षात येताच परिसरातील काही नागरिकांनी तत्काळ सतर्कता बाळगत आग लागल्याची माहिती इतरांना दिली आणि मदतकार्य सुरू केले. बाजारपेठेतील दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग वेगाने पसरू लागली आणि काही दुकानांना तिचा फटका बसला.

दरम्यान, शहरातील श्री पंचमुखी मारुती मंदिर येथे सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. तेथून ‘फायर बुलेट’ घेऊन ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याच्या कामाला गती मिळाली.यावेळी धोपट पाणीवाले, संदीप दिनेश नायक, नितीन शिंदे, अपी मोरे यांसह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पाण्याची तातडीने व्यवस्था केली. बादल्या, पाण्याच्या टाक्या व उपलब्ध साधनांचा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत एकजुटीने मदतकार्य केल्यामुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा संपूर्ण बाजारपेठ धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही दुकानांचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर शहरात सुसज्ज अग्निशामक यंत्रणा उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Ratnagiri News : अपघात की घातापाताचा कट? खाडीकिनारी असलेल्या हॉटेलला भीषण आग

याआधी देखील खेड तालुक्यातील एका हॉटेलला अशीच आग लागली होती.खाडीपट्टा परिसरातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झालं. या दुर्घटनेत संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगितलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार,स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ जलाल राजपुरकर यांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वणवा लागल्याचे आढळून आले नाही. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलच्या आवारात काही व्यक्ती अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्या वेळी जलाल राजपुरकर यांनी संबंधितांना पकडले असता त्यांच्याकडून धमकी देण्याचा तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि आता घडलेली ही दुर्घटना यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे

Web Title: Ratnagiri news massive fire breaks out in dapoli market major disaster averted due to citizens quick response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Dapoli News
  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.