Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?

जखमी झालेल्यांना दुखापतीच्या तीव्रतेनुसार नुकसानभरपाई द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत असलेल्या त्या वाहनचालकावरच गुन्हा दाखल झालेला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 22, 2025 | 12:22 PM
Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?

Follow Us
Follow Us:
  • दुखापतीच्या तीव्रतेनुसार नुकसानभरपाई द्यावी
  • शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाऱ्याऱ्यांचे दायित्वही निश्चित
सद्यस्थितीत रस्त्यावरील खड्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या खड्ड्यांत आणि उघड्या गटारात पडून कित्येकांचे मृत्यू झाले आहेत. उच्च न्यायालयाने याची दखल घेत सादर झालेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना प्रशासनावर सणसणीत ताशेरे ओढत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एखाद्यावर लक्ष ठेवणारी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवणे हे संविधानिक कर्तव्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. खड्डे, उघड्या गटाराचे झाकण आणि असुरक्षित रस्ते यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची दखल घेत या खड्यात नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसांना सहा लाख, तर जखमी झालेल्यांना दुखापतीच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते अडीच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Pune Municipal Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार

अधिकारी दायित्व निश्चित

यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाऱ्याऱ्यांचे दायित्वही निश्चित केले आहे. सदोष रस्त्यांच्या कामासाठी उत्तरदायी असलेले अधिकारी अभियंते आणि कंत्राटदार यांच्यावर विभागीय कारवाई व्हावी तसेच निष्काळजीपणामुळे मृत्यू किवा गंभीर दुखापती झाल्यास फौजदारी खटला चालवला जावा असे म्हटले आहे, मात्र त्यासमवेत वैद्यकीय अहवाल पोलिस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्याचा अहवाल जोडावा, असे म्हटले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अपघातासाठी वाहनचालकावरच गुन्हा दाखल

आतापर्यंतच्या अपघातांचे सगळे गुन्हे पाहता रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि अविचाराने वाहन चालवून अपघातास कारणीभूत झाला म्हणून त्या वाहनचालकावरच गुन्हा दाखल झालेला आहे. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती म्हणजे नेमकी काय, याबाबत कुठेही उल्लेख नसतो. वस्तुतः ती विशिष्ट परिस्थिती म्हणजे रस्त्यावरील खड्डेच असतात, मात्र तसा स्पष्ट उल्लेख न केल्याने रस्त्याची तथाकथित ‘विशिष्ट परिस्थिती’ निर्माण करणारे मोकाट सुटतात.

पळवाट काढण्याचा आता होणार प्रयत्न

मुळात या प्रश्नावर जनतेप्रति प्रशासन किती संवेदनशील आहे, हे तर आपण मागील अनेक वर्षांत पाहत आलो आहोत. ते तसे असते तर यासाठी सामान्य जनतेला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले नसते. आताही, प्रशासकीय अधिकारी यंत्रणा आणि ठेकेदार यांना वाचवण्यासाठी या नियमात पळवाट निश्चितपणे काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे की खड्ड्यांमुळेच अपघात झाला, असा जर पोलिस प्रशासनाकडून अहवाल गेला तरच पुढची सगळी कारवाई होऊ शकते आणि अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई मिळू शकते, असे एकंदरीत या नवीन नियमाप्रमाणे वाटत आहे.

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

पोलिसांना स्पष्ट शब्दात तपासाचे निर्देश द्यावेत

नवीन नियमाप्रमाणे जोपर्यंत पोलिस आपला अहवाल रस्त्यावरील पडलेल्या खड्यामुळेच अपघात झाला, असा इतक्या स्पष्ट शब्दात अहवाल जोपर्यंत देत नाहीत आणि अविचाराने व हयगयीने वाहन चालवल्याचा खोटा ठपका वाहनचालकावर ठेवणे बंद करत नाहीत तोपर्यंत कोणाला भरपाई मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे यापुढील सर्व अपघातात योग्य त्या पद्धतीने आणि स्पष्ट शब्दात तपास करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, असे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने समितीचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद करंदीकर यांनी दिले आहे. योग्य कारवाई न झाल्यास याबाबतची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Anyone died due to potholes then 6 lakh as compensation should be given to legal heirs what court said know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ratnagiri
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

World News :ट्रम्प यांच्या आश्वासनानंतर युक्रेनची चिंता कायम ;स्टारलिंक सेवा अद्याप पूर्ववत नाही
1

World News :ट्रम्प यांच्या आश्वासनानंतर युक्रेनची चिंता कायम ;स्टारलिंक सेवा अद्याप पूर्ववत नाही

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!
2

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
3

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!
4

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.