Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणवासियांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी Railway चा मोठा निर्णय; ‘इतक्या’ विशेष गाड्या सोडणार

यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, लाखो चाकरमानी त्यापूर्वी आठ दिवस कोकणात गावी दाखल होतील. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. रेल्वे, एसटीचे आरक्षण केले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 03:26 PM
कोकणवासियांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी Railway चा मोठा निर्णय; ‘इतक्या’ विशेष गाड्या सोडणार
Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवासाठी अनारक्षित मेम फेऱ्या सोडण्यावर भर
  • कोकण रेल्वेमार्गावर २४६ जादा फेऱ्या
  • प्रवाशांना अधिक पर्यायः गर्दीचे प्रभावीपणे नियोजन
गुहागर: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना दिलासा देत मध्य रेल्वेने २४६ विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, कोकणात येण्यासाठी भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि दिवा येथून कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि मडगावसाठी या विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या २४६ गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य अनरक्षित डबे असलेल्या १८४ मिश्र विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. याशिवाय ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६२ पूर्णतः अनरक्षित मेमू विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६ फेऱ्या आणि पुणे येथून १० फेऱ्या चालविल्या जातील.

यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, लाखो चाकरमानी त्यापूर्वी आठ दिवस कोकणात गावी दाखल होतील. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. रेल्वे, एसटीचे आरक्षण केले जात आहे. अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था करून प्रवाशांची गैरसोय टाळण्यावर भर देण्यात आला आहे.

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

२६ जुलैपासून सीएसएमटी-मंगळूरू एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन- तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाड्या सावंतवाडी रोड येथे थांबण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त सीएसएमटी-सावंतवाडी, एलटीटी- सावंतवाडी, दिवा-खेड मेमू, दिवा- चिपळूण आणि पुणे-रत्नागिरी या विशेष गाड्या विविध तारखांमध्ये चालवण्यात येणार आहेत.

एलटीटी-मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी मार्गावर साप्ताहिक तसेच द्विसाप्ताहिक विशेष फेऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, गर्दीचे नियोजनही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकण क्षेत्रातील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन प्रमुख गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निर्णयाची माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च २०२४ रोजी केलेल्या विनंतीनंतर, जनहितार्थ या थांब्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Central railway run 246 special trains kokan route for ganesh festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • central railway
  • Ganesh Festival
  • kokan railway

संबंधित बातम्या

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
1

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर
2

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’
3

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.