SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन
Chiplun News : कोकणातील चिपळूणमध्ये एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते आहे. यामध्ये राज्य सरकारच्या ‘एसआयआर’ (SIR) धोरणाविरोधात आता महाविकास आघाडीने थेट रस्त्यावर उतरुण आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीतर्फे येत्या 07 ऑक्टोबरला चिपळूणमध्ये भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज चिपळूणमध्ये उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः भास्कर जाधव करणार आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी थेट आजच्या ‘Gen-Z’ म्हणजेच नव्या पिढीतील तरुणाईला रस्त्यावर उतरण्याचे जाहीर आवाहन उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
महाविकास आघाडीचा हा मोर्चा असून बहादूर शेख येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरूवात होणार आहे. तसेच इंदिरा गाँधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यापासून या मोर्च्यांला सुरूवात होईल. या मोर्च्याला उत्तर रत्नागिरितल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. यात मंडनगड, दापोली, खेड, चिपळुन, आणि गुहाघर येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात जमावे, असे आवहान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
तसेच दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये ज्या झेन- जी तरुणांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठे आंदोलन केले, अशा झेन-जी तरुणांनी या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, ज्यांचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे; अशा लोकांनी या मोर्च्यांत सहभागी व्हावे. तसेच ”आम्ही तरुण संविधान आणि लोकशाहीचा खून होऊ देणार नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी मोर्च्यासाठी तरुणांना आवाहन केले आहे. तर हा मोर्चा निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी सुद्धा असेल असे स्पष्ट मत आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.”
सर्वोच्य न्यायलयाचे न्यायधिश निवृत्त होत आहे. सत्ताधारी राजकीय पद घेत आहेत. खासदारकीचे पद घेत आहेत. यात मुख्य निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. त्याची कारकीर्द ही वादग्रस्त ठरलेली आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
ममता बँनर्जी यांनी मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये बांगला देशी घुसवले आहेत. कारण आपल्या मतदार यादीमध्ये बांगला देशी मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हाला यादेशातील बांगलादेशींना बाहेर काढायचे आहे. या देशामध्ये भाजपाची 12 वर्षे सत्ता आहे. भाजपाने 12 वर्षांत किती बांगला देशी लोकांना बाहेर काढले असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. प्रत्येक राज्यात बांगला देशींविरुद्ध चर्चा घडवायची आणि राजकारण करायचे असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी केले. आपल्या देशात 2024 मध्ये 2 कोटी 6 लाख मतदार मतदान यादीमधून कमी करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप देखील आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.






