Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले

लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्याच्या लाचखोर अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ११) रंगेहात पकडून अटक केली आहे. मनोज दगु गायकवाड (वय ३७) असे या संशयित पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 01:40 PM
लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले

लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:

नाशिक : तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, तर पेठ तालुक्यात तुझ्या कुटुंबाची जी प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळेल…. कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका खाकी वर्दीतील अंमलदाराने एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेले हे शब्द आहेत. कुटुंबाच्या बदनामीची भीती दाखवून आधी ६० हजार रुपये उकळल्यानंतर, पुन्हा ९० हजारांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्याच्या लाचखोर अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ११) रंगेहात पकडून अटक केली आहे. मनोज दगु गायकवाड (वय ३७) असे या संशयित पोलीस अंमलदाराचे नाव असून, या कारवाईमुळे खाकी वर्दीला लागलेला डाग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 

…अशी घडली घटना

तक्रारदार व्यावसायिक हे मूळचे गुजरातचे असून, त्यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी ते महाराष्ट्रातून कोंबड्या खरेदी करून कारने गुजरातला ने-आण करतात. जून महिन्यात कोंबड्यांची वाहतूक करत असताना पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार मनोज गायकवाड याने त्यांना वांगणी परिसरात अडवले. तू कोंबड्यांची नाही, तर गुटख्याची बेकायदेशीर तस्करी करतोस, असा खोटा आरोप लावत त्याने धमकावण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने सर्व वैध कागदपत्रे दाखवूनही गायकवाडने ऐकले नाही आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेची भीती घालून जूनमध्येच ६० हजार रुपये उकळले.

तगादा आणि कारवाई

लाचखोराची भूक एवढ्यावरच भागली नाही. त्याने ५ जुलै रोजी पुन्हा फोन करून, गाड्या सुसाट जाऊ द्यायच्या असतील तर एक लाख द्यावे लागतील, अशी धमकी दिली. अखेर तडजोडीत ९० हजार रुपये ठरले. रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या व्यावसायिकाने नाशिक ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवली.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

चहाच्या टपरीवर रचला सापळा

पेठ रोडवरील हॉटेल राऊसमोरील एका चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी गायकवाड लाचेची रक्कम घेण्यासाठी पोहोचला. तक्रारदाराकडून ९० हजारांची रोकड स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Web Title: The acb has caught a police employee accepting a bribe from a businessman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
2

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
3

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.