Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News : हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १४ जुलै रोजी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुंबईतील विद्याविहार येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 12:58 PM
हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण

हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभर वृक्षारोपण
  • मुंबईत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम
  • १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, १४ जुलै रोजी राज्यभरात व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘हरित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी एसटी महामंडळाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या अभियानांतर्गत राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात स्थानिक हवामानाला अनुरूप तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी उपलब्ध जागेचा योग्य वापर करून विशेषतः कुंपणालगत वृक्षारोपण करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने सर्व विभागांना दिल्या आहेत. या राज्यव्यापी उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम मुंबई विभागीय कार्यालय, विद्याविहार येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् ‘लालपरी’ची सेवा ठप्प

महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वृक्षारोपण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्याचे नियमित संगोपन करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाची भावना सातत्याने जोपासण्यासाठी प्रत्येक विभागाने लागवड केलेल्या वृक्षांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानात स्थानिक आमदार, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींना सहभागी करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, एसटी कर्मचारी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणारा हा राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा ठरेल.” एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नसून, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी राज्यभरात जनजागृती निर्माण करणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

Web Title: Msrtc 78th foundation day statewide tree plantation drive pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
4

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.